Nashik : अक्षयची आईला IPS पदाची अनोखी भेट

Felicitation of Akshay Vakhare
Felicitation of Akshay Vakhareesakal
Updated on

नामपूर (जि. नाशिक) : प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात आईचं स्थान अनन्यसाधारण असते. तिच्या ऋणातून उतराई होणं शक्य नसले तरी तिच्या आनंदासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करीत असतो. येथील अभियंता अक्षय वाखारे याने आयपीएसपदाची (IPS) अनोखी भेट देऊन आपल्या आईची प्रशासकीय अधिकारी (Administrative Officer) होण्याची स्वप्नपूर्ती केली. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा (UPSC Exam 2021) नुकताच निकाल जाहीर झाला असून, त्यात अक्षयने देशात २०३ क्रमांकाची रँक मिळवून उत्तुंग यशाला गवसणी घातली. जिद्द, मेहनत, चिकाटी, सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर यश मिळविता येते, याचा आदर्श वस्तुपाठ त्याने समाजासमोर ठेवला आहे. (Akshay Vakhare passed UPSC become IPS AIR 203 Nashik News)

अक्षयचे वडील अनिल वाखारे नाशिकच्या करन्सी नोटप्रेसमध्ये असून, आई गृहिणी आहे. अक्षयने पुणे येथे राहून प्रचंड मेहनत घेत सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर यश मिळवले. मुलावर चांगले संस्कार केल्याने आपल्याला यशाचे वाटेकरी होता आले, असे अक्षयचे आई-वडील स्वाभिमानाने सांगतात. अक्षय लहानपणापासूनच हुशार होता. त्याचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या विनिता विकास मंडळ शाळेत, तर माध्यमिक शिक्षण नाशिक रोडच्या पुरुषोत्तम विद्यालयात धाले. दहावीनंतर अक्षयने शासकीय तंत्रनिकेतनमधून डिप्लोमा आणि डिग्रीचे शिक्षण घेतले.

पदवीनंतर त्याने पुणे गाठले. तेथे काही दिवस नोकरी केली. २०१८ पासून त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेकडे लक्ष केंद्रित केले. त्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास सुरू केला. दोनवेळा अपयश आले. परंतु खचून न जाता तिसऱ्या प्रयत्नात त्याचे प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न साकार झाले.

Felicitation of Akshay Vakhare
दहिवड व धोबीघाट परिसरात पावसाळ्याचा पहिल्या पावसाची हजेरी

परीक्षेचे स्वरूप समजून घेऊन अभ्यासाची तयारी करावी, स्वयंअध्यनाबरोबरच अभ्यासात सातत्य ठेवावे, असा सल्ला अक्षयने ग्रामीण भागातील तरुणांना दिला. होतकरू विद्यार्थ्यांना विनामूल्य मार्गदर्शन करण्याची त्याची इच्छा आहे. त्याच्या यशाबद्दल मोसम प्रतिष्ठान, सहकारमहर्षी जेसी ग्रुपतर्फे नुकताच सत्कार करण्यात आला.

"दहावीनंतर मला खरंतर डॉक्टर होण्याची मनापासून इच्छा होती. परंतु काही अपरिहार्य कारणास्तव मेकॅनिकल इंजिनिअरिंगकडे वळावे लागले. माझी आई, वडील यांनी मला यूपीएससी परिक्षेसाठी अत्यंत मोलाची साथ दिली. कष्ट करण्याची इच्छा असणारा प्रत्येक तरुण यूपीएससीचं स्वप्न साकार करू शकतो. समाजसेवेच्या कामातून स्पर्धापरिक्षेकडे वळल्याने अधिकारी होवून समाजऋण फेडणे यासाठी मी कटाक्षाने लक्ष देईल."

- अक्षय वाखारे, यूपीएससी उत्तीर्ण

Felicitation of Akshay Vakhare
चांदवडला मॉन्सूनपूर्व पाऊस; विजेचा खांब कोसळला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.