Nashik News: NMCत कामांची माहिती गोळा करण्याची जुळवाजुळव सुरू; कामकाजाचा लेखाजोखा घेणार खुद्द पालकमंत्री!

Dada Bhuse & NMC
Dada Bhuse & NMCesakal
Updated on

Nashik News : राज्यातील सत्तेचे राजकारण स्थिरस्थावर होत असताना आता सत्तेतील तीनही पक्षाकडून निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे.

त्याचाच एक भाग म्हणून गेल्या दीड महिन्यांपासून आयुक्ताविना कामकाज सुरू असलेल्या महापालिकेच्या कामकाजाचा लेखाजोखा खुद्द पालकमंत्री दादा भुसे घेणार आहेत.

त्याअनुषंगाने महापालिकेत कागदपत्रांत्र्या कामांची माहिती गोळा करण्याची जुळवाजुळव सुरू झाली आहे. (Alignment to collect information on works in NMC guardian minister bhuse himself will take account of work Nashik News)

१५ मार्च २०२२ ला नाशिक महापालिकेची मुदत संपुष्टात आल्यानंतर प्रशासकीय राजवट लागू झाली आहे. दीड वर्षांपासून प्रशासकीय कामकाज सुरू असताना माजी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले जात नसल्याची तक्रार आहे.

शहराचे अनेक महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित असून, प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याची प्रामुख्याने तक्रार आहे.

त्याचबरोबर रस्त्यांवरील खड्डे, नुकताच सिटीलिंक कर्मचाऱ्यांनी केलेला संप, अधिकाऱ्यांच्या वादग्रस्त बदल्या, लोकप्रतिनिधी नसल्याने महासभा व स्थायी समितीमध्ये मंजूर करण्यात आलेले वादग्रस्त विषय, याअनुषंगाने नाशिक महापालिकेचे कामकाज सर्वच स्तरावरून वादग्रस्त ठरत आहे.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत नाशिक महापालिकेची घसरलेली क्रमवारी हादेखील एक चिंतेचा विषय आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दादा भुसे यांच्यामार्फत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर बैठक शनिवार किंवा रविवारी होईल, त्याअनुषंगाने महापालिकेला सूचना आल्या असून, माहिती गोळा करण्यासाठी महापालिका मुख्यालयात प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dada Bhuse & NMC
Nashik News: पालकमंत्र्यांच्या सहमतीअभावी रखडली नियुक्ती; नियमित NMC आयुक्त नसल्याने कामकाज रामभरोसे

सिंहस्थ आराखड्यावर होणार चर्चा

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विकास आराखडा तयार करणे आवश्यक आहे. यापूर्वीच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री भुसे यांनी सिंहस्थाच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने महापालिकेने काय तयारी केली, या संदर्भातदेखील आढावा घेतला जाणार आहे.

या कामांचा घेणार आढावा

- महापालिकेतील वादग्रस्त पदोन्नती व चौकशीची सद्यःस्थिती.
- सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकास आराखडा.
- सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित बाह्यवळण रस्ता.
- बांधकाम व्यावसायिकांना नगररचना विभागात येणाऱ्या अडचणी.
- दादासाहेब फाळके स्मारक पुनर्विकास.
- दारणा धरण ते नाशिक रोड जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत थेट पाइपलाइन.
- अमृत दोन योजनेत मंजूर झालेले प्रकल्प व सद्यःस्थिती.
- गंगापूर व दारणा धरणातील पाणी स्थिती.
- गेल्या वर्षभरात मंजुरी दिलेले वादग्रस्त प्रकल्प.
- उड्डाणपुलाखालील रंगरंगोटी.
- मेट्रो निओ, मल्टी मॉडेल हब.
- एमएनजीएलकडून रस्त्यांची खोदाई.
- गंगापूर ते शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत लोखंडी पाइपलाइन प्रस्ताव.
- घरपट्टी व पाणीपट्टीचा वसुलीचा आढावा.
- शहरात वाढणारे अतिक्रमण.

Dada Bhuse & NMC
NMC Recruitment: महापालिकेची भरती प्रक्रिया रखडली; बेरोजगारांचे भरतीकडे डोळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.