पंचवटी (नाशिक) : ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष कुलतरणसिंग अटवाल, वेस्ट झोनचे उपाध्यक्ष विजय कालरा यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशात ‘ज्याचा माल त्याचा हमाल’ हा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारपासून (ता. ५) त्याची अंमलबजावणी होणार आहे. (All India Motor Transport Congress decides to implement whose goods are his porters rules)
राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार हमाली वराई ज्याचा माल असेल त्यांनीच देणे अनिवार्य आहे. मात्र असे असूनही व्यापारी, उद्योजक, कृषी उत्पन्न बाजार समिती हे हमाली वाहन मालकांकडून वसूल करतात. याविषयी वारंवार ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट काँग्रेस नाशिक टीमने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, कृषी उत्पन्न बाजार समिती यांना निवेदन दिले होते. परंतु तरीही अवैध हमाली वराई घेणे बंद झाले नाही म्हणून अटवाल यांनी संपूर्ण देशात ज्याचा माल त्याचा हमाल या निर्णयाची घोषणा केली आहे, त्या अनुषंगाने ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट काँग्रेसची बैठक २७ ला नाशिक येथील कार्यालयात झाली. बैठकीत सर्वसंमतीने जिल्ह्यात ५ ऑगस्टपासून हमाली वराई कोणत्याही व्यापारी, उद्योजक, कृषी उत्पन्न बाजार समिती यांना वाहन मालकांकडून वसूल करू देणार नाहीत, ‘ज्याचा माल त्याचा हमाल’ हा निर्णय घेण्यात आला. जर कोणताही व्यापारी, उद्योजक, कृषी उत्पन्न बाजार समिती वाहन मालकांना हमाली देण्यास वेठीस धरत असेल, तर वाहन मालकाने, चालकाने ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट काँग्रेस नाशिक टीमशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट काँग्रेस नाशिकचे अध्यक्ष सचिन जाधव, अंजू सिंघल, अवतारसिंग बिर्दी, संजय तोडी, रामभाऊ सूर्यवंशी, किरण भालेकर, विनायक वाघ, परवेज पठाण, प्रवीण अग्रवाल, सोनू शर्मा, ज्ञानेश्वर वरपे, एस. एन. शर्मा, रतन अग्रवाल, अतुल रावल, विनोद शर्मा, पवन क्षीरसागर, सचिन खैरनार, राजू पवार, तुषार गायकवाड, संदीप करांडे, हेमंत सिंग, भाऊसाहेब सोनवणे उपस्थित होते.
(All India Motor Transport Congress decides to implement whose goods are his porters rules)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.