नाशिक : मराठा समाजाला आरक्षण (maratha reservation) मिळाले पाहिजे ही सर्वांचीच भावना आहेत त्यासाठी पक्षीय जोडे व राजकारण बाजूला ठेवून आरक्षणाला पाठिंबा देऊ त्यासाठी दिल्लीपर्यंत धडक मारण्याची देखील तयारी आहे असे आश्वासन सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी दिले संसदेत खासदार तर राज्यामध्ये आमदार विधानसभा व विधान परिषदेमध्ये हा प्रश्न मांडल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे मात्र इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नये ही देखील समाजाचे भावना असल्याचे मत यावेळी अनेक लोकप्रतिनिधींनी व्यक्त केले.
खासदार संभाजीराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन
सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण नाकारल्यानंतर राज्यभरातून विविध प्रतिक्रिया येत आहेत या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मूक मोर्चा चे खासदार संभाजीराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले जात आहे कोल्हापूर येथे मूक मोर्चा पार पडल्यानंतर आज नाशिक मध्ये रावसाहेब थोरात सभागृह गवळी मैदानावर लोकप्रतिनिधी जी भूमिका समजून घेण्यासाठी बैठक झाली त्यावेळी विविध मान्यवरांनी मत व्यक्त केले.
(All-party-leaders-support-Maratha-reservation-nashik-marathi-news)
टाळु वरचे लोणी खाणाऱ्यांना बाजूला काढा- दादा भुसे
हॅलो राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे भावी पिढीसाठी ते आरक्षण गरजेचे आहे पक्षाचे राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्वांना सोबत घेऊन मार्गक्रमण करावे लागेल. शासन पातळीवर जी जबाबदारी घ्यायची असेल ती मी घेईल. केंद्र सरकारपर्यंत भूमिका पोहोचवेल आंदोलनाची वेळ येणार नाही इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मिळाले पाहिजे ही देखील मराठा समाजाची भावना आहे आरक्षणाची मागणी फक्त मराठा समाजाची नाही इतर समाजाची देखील मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही भूमिका आहे त्यासाठी दिल्लीवर कूच करण्याची गरज पडल्यास नाशिक जिल्हा आघाडीवर राहील. राजकारण करणारे अनेकजण आहेत टाळूवरचे लोणी खाणार यांना खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी बाजूला करावे एक मुखाने संभाजीराजांच्या मागे उभे रहावे. संभाजी राजांनी इतर समाजाचे प्रश्न ही सोडवण्याची भूमिका घ्यावी कारण मराठा समाज हा मोठा भाऊ आहे.
एकीची गरज- आमदार ढिकले
आमदार राहुल ढिकले म्हणाले, बेरोजगारीच्या चिंतेमुळे मराठा समाजातील तरुणवर्ग वैफल्यग्रस्त झाला आहे समाजाच्या कल्याणासाठी आरक्षणाशिवाय पर्याय नाही. मराठा समाजा मुळे मी आज आमदार म्हणून निवडून आलो आहे त्यामुळे आरक्षणाची जबाबदारी माझ्यावर आहे त्यासाठी संघर्षाची भूमिका घेण्याची माझी तयारी आहे. मोठ्या प्रमाणात विखुरलेल्या मराठा समाज एकत्र करण्याचे काम खासदार संभाजीराजे यांनी केले आहे त्यांना सर्वांचा पाठिंबा आहे. आरक्षण मिळण्यासाठी एकीची गरज असून त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा भूमिका मांडण्याची तयारी त्यांनी दर्शविली.
आरक्षणाला माझा व समाजाचा पाठिंबा - नितीन पवार
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. आतापर्यंत मराठा समाजाने मोठ्या भावाची भूमिका घेतली आहे आदिवासी समाजाच्या वतीने आरक्षणाला माझा पाठिंबा राहील.
आरक्षणासाठी कटिबद्ध -आमदार दिलीप बनकर
समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सर्वजण प्रयत्न करतात समाज बोलतो त्या वेळी लोकप्रतिनिधी जन्माला येतात समाजाची आरक्षणाची भूमिका आहे त्या भूमिकेला माझा पाठिंबा आहे कुठल्याही समाजाचे आरक्षण कमी होऊ नये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कटिबद्ध आहे समाजाच्या पाठीशी कायम उभा राहिलो व यापुढेही राहील अशी भूमिका आमदार दिलीप बनकर यांनी मांडली.
इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का नको- झिरवाळ
विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे मात्र कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का पोहोचू नये ही भूमिका आहे. विधानसभेच्या पुढील अधिवेशनामध्ये अंतकरणापासून या विषयावर सहभाग नोंदवेल. मराठा आरक्षणासंदर्भात जेथे कुठे मदत लागेल तेथे छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणून उभा राहील अशी ग्वाही श्री झिरवाळ यांनी दिली.
आरक्षण लढाईसाठी कटिबद्ध -सरोज अहिरे
जवलीचे आमदार सरोज अहिरे म्हणाल्या आरक्षण आणि मराठा समाजाच्या हक्काची लढाई आहे समाजाला आरक्षण मिळण्यासाठी कटिबद्ध आहे मोठा भाऊ म्हणून मराठा समाजाने आतापर्यंत इतरांना आधार दिला त्यामुळे आता मराठा समाज बांधवांसाठी मी पुढाकार घेईन.
समाजाचा पाईक म्हणून उभा राहील- कांदे
आमदार सुहास कांदे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मी कटिबद्ध आहे शासनाचा प्रतिनिधी म्हणून मी आरक्षणासाठी कायम बरोबर राहील त्यासाठी एक दिवसाचे अधिवेशन बोलावले पाहिजे अशी मागणी कांदे यांनी केली, कोपर्डी घटनेतील दोषींना तत्काळ शिक्षा व्हावी ज्यांनी आरक्षणासाठी बलिदान दिले त्यांना मदतीसाठी मिळण्यासाठी पाठपुरावा करू.
आरक्षणाला पाठिंबा- फरांदे
आमदार देवयानी फरांदे म्हणाल्या, मराठा समाजाच्या आरक्षणाला माझा पाठिंबा आहे, मराठा व इतर मागासवर्गीय समाजाचे आरक्षणाचे प्रश्न गंभीर आहे दोन्ही समाजाला आरक्षणाची गरज आहे.
आरक्षण मिळावे हेच उद्दिष्ट- आहेर
अनेक दशकांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी आहे प्रत्येकाचे मार्ग वेगळे असले तरी आरक्षण मिळावे हेच उद्दिष्ट आहे खासदार संभाजीराजे यांच्या मध्ये मराठा समाजाला एक एकत्र आणण्याची ताकद आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी विधानसभेत एकमताने जबाबदारी पार पाडेल आंदोलनाला दिशा देण्याचे काम छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी करावे.
आरक्षणाच्या पाठीशी- दराडे
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे त्यासाठी विधानपरिषदेत आरक्षणाचा विषय त्यावेळेस माझा पाठिंबा राहील अशी ग्वाही विधान परिषदेचे आमदार नरेंद्र दराडे यांनी यावेळी दिली.
समिती स्थापन करा- हिरे
आमदार सीमा हिरे म्हणाल्या मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी समिती स्थापन केली पाहिजे. समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची स्थापना झाली पाहिजे त्याची जबाबदारी मी स्वतः येईल त्यासाठी समिती स्थापन करावी अशी मागणी त्यांनी केली.
सरकारवर दबाव निर्माण करू- कोकाटे
आमदार माणिकराव कोकाटे म्हणाले मराठा आरक्षण ही काळाची गरज आहे त्यासाठी सरकारवर दबाव निर्माण करू संभाजीराजे यांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा त्यांच्या खांद्याला खांदा लावून मराठा आरक्षणासाठी लढण्याची तयारी आहे.
संसदेत बाजू मांडणार- खासदार पवार
मराठा आरक्षणाचा मुद्दा चे आई वडील संसदेतील त्यावेळे प्रखरपणे बाजू मांडू आरक्षणासंदर्भात सखोल विश्लेषण झाले पाहिजे राज्य सरकारने त्यासाठी सविस्तर माहिती द्यावी आरक्षणासाठी अभ्यासू ती तयार झाली पाहिजे असे खासदार भारती पवार यांनी भूमिका मांडली.
आरक्षणाला कायम पाठिंबा-भामरे
मराठा आरक्षणाला माझा कायम पाठिंबा राहिला आहे व यापुढेही राहील आरक्षणाच्या संदर्भात केव्हाही मला हाक द्या मी प्रखरपणे बाजू मांडेल संसदेच्या अधिवेशनात आरक्षणासंदर्भात मागणी करेल आरक्षणासाठी मी कटिबद्ध आहे असे खासदार सुभाष भामरे म्हणाले.
मराठ्यांच्या प्रश्नाला निश्चित यश- खासदार गोडसे
आरक्षणासाठी गेल्या अनेक दशकांपासून लढा देणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाला निश्चित यश मिळेल मागासवर्गीयांना आरक्षण मिळावे यासाठी छत्रपती शाहू महाराज यांनी प्रयत्न केले मात्र आज परिस्थिती बदलली आहे सदर मराठा समाजावर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे घटनेनुसार समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे संसदेत सर्व खासदार मराठा आरक्षणाला पाठिंबा देतील सारथी या संस्थेला देखील शासनाने बळ द्यावे असे खासदार हेमंत गोडसे म्हणाले.
सामाजिक न्याय यापासून समाज वंचित- तांबे
मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे मराठा समाज आता मागासलेला आहे सामाजिक न्याय यापासून समाज वंचित आहे त्यामुळे समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी भूमिका आमदार सुधीर तांबे यांनी मांडली.
मराठा समाज जबाबदार घटक- संभाजी राजे भोसले
लोकप्रतिनिधींनी भूमिका मांडल्यानंतर त्यावर बोलताना खासदार संभाजीराजे भोसले म्हणाले, मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी मोर्चा स्थळी उपस्थित राहिले त्याबद्दल आभार आरक्षणासाठी मराठा समाजाने लाखोंचे 58 मोर्चे काढले मोर्चाच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या मोर्चाच्या माध्यमातून समाजाचे दुःख समोर आले, आतापर्यंत मराठा समाज मोठा भाऊ म्हणून उभा राहिला यापुढेही राहील छत्रपती शाहू महाराज यांनी सर्व जातीसाठी लढा दिला आरक्षण हे सर्वप्रथम शाहूमहाराजांनी आणले मात्र आज मराठा समाज बाजूला फेकला गेला आहे जातीव्यवस्था फोफावत आहे म्हणून मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे, आरक्षण नसल्याने मराठा समाज आज दुखी आहे त्यामुळे आरक्षणाची मागणी करतो आम्ही मोर्चे काढू शकतो दोन मिनिटात वातावरण गढूळ होईल त्याला वेळ लागत नाही मात्र आम्ही एक जबाबदार घटक आहोत म्हणून मूक मोर्चा च्या माध्यमातून आम्ही व्यथा व्यक्त करत आहोत लोकप्रतिनिधीने आता भूमिका घ्यावी आत्तापर्यंत समाज बोलला आहे लोकप्रतिनिधींनी त्यांच्या परीने आरक्षणासाठी लढा द्यावा मी महाराष्ट्राचे नेतृत्व करत नाही बहुजन समाज कसा एकत्र येऊ शकतो ही माझी भूमिका आहे आरक्षणाचे काय पर्याय उपलब्ध आहे त्याचा वापर मांडतांना, राज्य शासनाच्या हातात असलेल्या गोष्टी त्यांनी मार्गी लावावा व केंद्र सरकारने पर्यायांचा विचार करावा अशील खासदार संभाजीराजे यांनी केली.
(All-party-leaders-support-Maratha-reservation-nashik-marathi-news)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.