NMC Fraud News : महापालिकेच्या महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून महिलांसाठी मोफत प्रशिक्षणाचे काम दिलेल्या इंद्रजित टेक्निकल इन्स्टिट्यूट व गंगुस फाउंडेशनकडून दिडशे महिलांची आर्थिक फसवणूक झाल्याने महापालिकेच्या प्रशिक्षण कार्यक्रमाला गालबोट लागले आहे.
यासंदर्भात तातडीने चौकशी करण्याची मागणी शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केली आहे. (Allegation of fraud of women by organization provided by Municipal Corporation nashik news)
महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून महिलांना स्वयंरोजगारासाठी मोफत प्रशिक्षण दिले जाते. जवळपास वीस कोर्सेस विभागनिहाय शिकविण्यासाठी पंचवटीतील इंद्रजित टेक्निकल इन्स्टिट्यूटला काम देण्यात आले आहे. सिडको विभागात महिलांना प्रशिक्षण देण्यापूर्वी दिडशे महिलांकडून प्रत्येकी सहा हजार रुपये गोळा केल्याचा आरोप महिलांनी केला असून, यासंदर्भात शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांना निवेदन दिले.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व खादी ग्रामोद्योग यांचा हा उपक्रम असल्याचे खोटे सांगून १५० महिलांची फसवणूक केल्याचे निवेदनात नमूद केले आहे. दिडशे महिलांनी प्रत्येकी सहा हजार रुपये दिले आहेत. कर्ज तर मिळाले नाहीच, त्याशिवाय साधा रोजगारहीदेखील उपलब्ध केलेला नाही. इंद्रजित इन्स्टिट्यूटचे संचालक कैलास सोनवणे व ईश्वरमूर्ती बोडके यांनी संगनमताने नऊ लाख रुपये जमा केले आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
पैसे परत करण्याची टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. संगीता पाटील, अश्विनी धनगर, पूजा मंडलिक, शीतल शिरोडे, सुनीता सोनजे, विजय पाचपांडे, राहुल पाटील, सुनीता पाटील, अर्चना पाटील, माधुरी सोनार, सुनील सोनवणे, मधुकर पाटील, योगिता चौधरी, ज्योती चौधरी, धनश्री चौधरी, प्रशांत ठाकरे, मनीषा शिंदे, माधुरी शिंदे, अरुणा व्यवहारे, दीपाली चौधरी, रेशमा भुसे, सुवर्णा मांडोळे, दीपाली पाटील, सपना सूर्यवंशी, योगिता वाघ आदींनी श्री. बडगुजर यांना निवेदन दिले. याप्रकरणी लक्ष घालण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.