Nashik ZP News : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील काम वाटपाबाबत तक्रारी असतानाच, वादात सापडलेल्या पुनर्विनियोजनातील निधीतील काही कामांचे काम वाटप समितीच्या माध्यमातून ठेकेदारांना वाटप करण्यात आल्याचे समोर आले आहे. (Allotment of works before approval in Zilla Parishad nashik news)
बांधकाम विभाग दोनमध्ये हा प्रकार घडला असून ही बाब उघडकीस येताच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घाईघाईने काम वाटप रद्द करीत संबंधित कार्यकारी अभियंता व कर्मचाऱ्यांची खरडपट्टी काढल्याचे समजते. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पुनर्विनियोजनातील कामांचे वाटप अथवा निविदा राबवू नये, अशा सक्त सूचना दिल्या आहेत.
जिल्हा नियोजन समितीने २०२२-२३ या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेतून सर्वसाधारण योजनेतून जिल्हा परिषद वगळता इतर कार्यान्वयन यंत्रणांना दिलेल्या निधीतील बचत निधीचे मार्च अखेरीस पुनर्विनियोजन केले. निधीचे पुनर्विनियोजन करताना उपलब्ध निधीच्या जवळपास दहा पट कामांना अतिरिक्त प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या आहेत.
या नियोजनावर महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झाले असून त्यांनी राज्याचे अर्थ सचिव यांच्याकडे तक्रारी देखील केल्या असून, या अनियमितेची चौकशी करून नियोजन रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे पुनर्विनियोजन निधी नियोजन वादात सापडलेले आहे. यापार्श्वभूमीवर, जिल्हा परिषदेनेही जिल्हा नियोजन समितीकडे दहा टक्के निधीऐवजी पूर्ण निधी देण्याची मागणी करीत तूर्तास या निधीतील कामांची निविदा प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेऊन संबंधितांना तशा सूचना दिल्या आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
असे असताना देखील बांधकाम विभाग क्रमांक दोन मधील मार्च महिन्याच्या काम वाटप समितीच्या कामांच्या यादीत पुनर्विनियोजनात मंजूर केलेल्या सात कामांचा समावेश केला गेला. विशेष म्हणजे या कामांना २७ मार्चला निधी मंजूर केला असताना त्यापूर्वीच्या काम वाटप समितीच्या कामांच्या यादीत या कामांचे वाटप केले गेले आहे.
एवढेच नाही तर येवला तालुक्यातील ठेकेदारांना या कामांच्या शिफारशीही देण्यात आल्या. या प्रकरणात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अंधारात ठेवण्यात आले. मात्र, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी तातडीने बांधकाम विभाग क्रमांक दोनच्या कार्यकारी अभियंता शैलजा नलावडे यांच्यासह संबंधित कर्मचाऱ्यांना खडेबोल सुनावण्यात आल्याचे समजते.
त्यानंतर त्यांनी बांधकाम विभागाच्या तीनही कार्यकारी अभियंता, काम वाटप समिती व निविदाचे काम बघणारे कर्मचारी यांना बोलावून पुनर्विनियोजनातील निधीतील कामांबाबत काहीही कार्यवाही न करण्याचे आदेश दिले. या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.