नाशिक शहर पोलिसात 'Alpha' सामील

Alpha Dog
Alpha Dog esakal
Updated on

नाशिक : महाराष्ट्र पोलीस नाशिक शहर पोलीस स्फोटक शोध विभागाला प्रथम बेल्जियन मालिनॉइस श्वान अल्फा नाशिक शहरात दाखल झाला आहे.

महाराष्ट्रात विविध पोलीस विभागात स्फोटक शोध, अंमली पदार्थ आणि गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी फँटम केनाईन्स प्रायव्हेट लिमिटेडद्वारे प्रदान केलेले बेल्जियन मेलिनोईस प्रजातीचे श्वान विविध शहरात यशस्वीरित्या सुपूर्त करून तैनात केले आहे. नाशिक शहर श्वानपतकात दाखल झालेल्या बेल्जियम श्वानाचे अल्फा असे नाव ठेवण्यात आले आहे. (Alpha name dog Joins Nashik City Police Nashik Latest marathi news)

सोलापूर शहरात महाराष्ट्र पोलिसांच्या पहिल्या बेल्जियन मालिनॉइस श्वानापासून सुरुवात झाली, त्यानंतर गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, नांदेड, कोल्हापूर, बीड, लातूर आणि नागपूर इ. पोलीस विभागांना कुख्यात गुन्हेगाराचा माग काढण्यासाठी आणि त्यांना पकडण्यासाठी तसेच अंमली पदार्थ शोधून गुन्हेगारांना पकडण्यासाठी ह्या श्वानांचा उपयोग होतो आहे.

यावेळी अल्फाचे स्वागत करण्यात आले. यावेळी नाशिक शहर पोलिसांच्या श्वानपथकाचे वरिष्ठ पो. नि. हुंबे, पोलिस निरीक्षक गायकवाड, हवालदार चव्हाणके, शेटे, नंदू उगले, बाविस्कर, शेख होते. फँटम केनाईन्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक नितीन बिऱ्हाडे, हर्षल साळवे, निखिल राणे, मयूर दाणी, पंकज जाधव, विशाल जाधव रोशन काळे उपस्थित होते.

Alpha Dog
MVP Election : इच्छुकांसाठी निवडणूक नियमावली जारी; इच्‍छुकांकडून अनेक अर्ज

बेल्जियन मेलिनोईस प्रजातीच्या श्वानांची कामगिरी

ओसामा बिन लादेनचा खात्मा करणार्‍या नेव्ही सील टीमसोबत असलेले के-9 हे कैरो हे देखील बेल्जियन मालिनॉइस आहे. तो आता निवृत्त झाला आहे आणि त्याच्या हँडलरसोबत राहतो, असे न्यूयॉर्क पोस्टने वृत्त दिले आहे.

आयएसआयएस म्होरक्या अबू बकर अल-बगदादीचा पाडाव करण्यासाठी आर्मीच्या डेल्टा फोर्स एलिट युनिटसह बेल्जियन मालिनॉइस नावाचे श्वान कर्तव्यात जखमी झाले होते आणि नंतर स्ट्राइप्सच्या वृत्तानुसार, शौर्याबद्दल तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी त्याचा गौरव केला होता.

सध्या जगभरात K-9 ऑपरेशन्समध्ये काम करणारे अनेक बेल्जियन मेलिनोईस प्रजातीचे श्वान आहेत जे तेवढेच धाडसी, निष्ठावान आणि निस्वार्थी आहेत

Alpha Dog
पौरोहित्‍यातही महिलाराज : स्‍त्री पौरोहित्‍याची पध्दत वैदिक काळापासून

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()