Air Pollution Prevention : औद्योगिक क्षेत्र हे जागतिक आर्थिक वाढीचा एक महत्त्वाचा घटक आहे. रोजगारनिर्मिती आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान देत आहे.
त्याचवेळी डिझेल जनरेटर (डीजी) संचांमुळे होणाऱ्या वायूप्रदूषणात वाढ झाल्याची चिंता बहुतांश उद्योगांना आहे. (Amar Durgule statement Modern technology should be used to prevent air pollution nashik news)
डिझेल-चालित अंतर्गत ज्वलन इंजिनांसाठी, विशेषतः आठशे केव्ही (हजार केव्हीए) सकल यांत्रिक शक्तीसाठी उत्सर्जन नियंत्रण उपकरणांचे (आरईसीडी) रीट्रोफिटिंगचे अनुकूलन ही काळाची गरज आहे आणि सर्व क्षेत्रांनी त्याची अंमलबजावणी केली पाहिजे.
आपण अधिक पर्यावरणाच्या दृष्टीने सजग भविष्याकडे वाटचाल करत असताना, उत्सर्जन नियंत्रण उपकरणांचे रेट्रोफिटिंग हे केवळ नियामक आवश्यकता म्हणून नव्हे तर जबाबदार पर्यावरणीय कारभाराची बांधिलकी म्हणूनही पाहिले पाहिजे.
पर्यावरणाच्या हितासाठी उद्योगांनी लवकरात लवकर रेट्रोफिटिंग करावे, असे आव्हान एमपीसीबीचे उपप्रादेशिक अधिकारी अमर दुर्गुळे यांनी केले.
कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री उत्तर महाराष्ट्र झोनने नाशिक येथे उद्योगांसाठी उत्सर्जन नियंत्रण उपकरणे ग्रहण करणे या विषयावर विशेष सत्राचे आयोजन केले होते. हे सत्र ज्ञान भागीदार चक्र इनोव्हेशन, किर्लोस्कर केअर आणि धनश्री टेक्नोक्रॅट्स यांनी आयोजित केले होते.
या चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी अमर दुर्गुळे बोलत होते . या वेळी सीआयायचे उपाध्यक्ष, उत्तर महाराष्ट्र झोन आणि संचालक, फॉक्स सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड चे जॉय अलूर, ईएचएस, सीमेन्स लिमिटेडचे वरिष्ठ व्यवस्थापक घनश्याम पाटील, चक्र इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेडचे सहाय्यक उपाध्यक्ष व विक्री विभागाचे मुदित मित्तल, धनश्री टेक्नोक्रॅट्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक उदय ठाकरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला नाशिक आणि आसपासच्या उद्योगांमधील १०० हून अधिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.