नाशिक : मूकबधिर असणे तरुणांसाठी रोजगार मिळविण्यातील मोठा अडथळा ठरतो. मात्र, नाशिकच्या हर्षल महाजनने यावर मात केली असून, त्याचे आयुष्य नोकरीमुळे खूप सुधारले आहे. हर्षलला आता एक वर्ष पूर्ण होत आले असून, आज तो इतरांना पगार देत आहे. तसेच कुटुंबाचे पालनपोषणही करतोय..
लहान भावाचे शिक्षण पूर्ण करण्याचे स्वप्न; नोकरीमुळे आयुष्यच बदलले!
नाशिकचा रहिवासी असलेल्या हर्षलला बारावीत शिक्षण सोडावे लागले. त्याने अनेक ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न केला, पण त्याला ऐकू येत नसल्यामुळे बहुतेक ठिकाणी त्याला कामावर ठेवून घेण्यास नकार दिला. दादरच्या विशेष कौशल्य शाळेतील मार्गदर्शकांकडून हर्षलला ॲमेझॉन इंडियाबद्दल समजले. कुटुंबाला हातभार लावणे आणि आपल्या धाकट्या भावाचे शिक्षण करणे हर्षलचे स्वप्न आहे. हर्षल त्याची आई आणि धाकट्या भावासोबत राहतो. सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करणाऱ्या आईच्या हातात तो दर महिन्याला अभिमानाने पगार देतो. तीन जणांचे कुटुंब आर्थिक हमी व सुरक्षिततेचे आयुष्य जगू शकत आहे. माझ्यासारख्या लोकांना नीट नोकरी मिळणे खूप कठीण आहे. ॲमेझॉनने मला संधी दिली. संवादात मदत करण्यासाठी येथे दुभाषी (इंटरप्रीटर) असतात. सर्वांना सामावून घेणाऱ्या कार्यसंस्कृतीमुळे घरात असल्यासारखे वाटते. मला जो पगार मिळतो, त्यातून मला कुटुंबाला हातभार लावता येतो आणि विशेषत: धाकट्या भावाच्या शिक्षणाचा खर्च करता येतो, असे हर्षल महाजन यांनी नमूद केले.
हर्षल मुंबईतील आउटबाउंड विभागात फुलफिलमेंट सेंटर सहाय्यक म्हणून कामावर रुजू झाला आहे. ॲमेझॉनमध्ये काम सुरू करून हर्षलला आता एक वर्ष पूर्ण होत आले असून, त्याचे आयुष्य नोकरीमुळे खूप सुधारले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.