सिडको (जि. नाशिक) : अंबड औद्योगिक वसाहतीत शेकडो छोट्या- मोठ्या कंपन्या असून या ठिकाणी हजारो कामगार काम करतात. घरकुल योजना, दत्तनगर, कारगिल चौक तसेच याच भागात असल्याने गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. (Ambad midc police station starting from April 10 nashik news)
यामुळे सशस्त्र हल्ले, खून, दरोडा, कामगारांची लूटमार यासारख्या प्रकारांमध्ये वाढ होऊ लागली आहे. यासाठी अंबड ग्रामस्थांसह उद्योजकांनी अंबड पोलिस ठाण्याचे विभाजन करून एमआयडीसी भागात स्वतंत्र पोलिस ठाणे व्हावे, अशी मागणी केली होती. यासाठी विविध आंदोलने मोर्चेदेखील काढण्यात आले होते.
अखेर या मागणीला यश आले असून येत्या १० एप्रिलपासून अंबड एमआयडीसी पोलिस चौकी, पोलिस निरीक्षक, दोन सहाय्यक पोलिस निरीक्षक, ३० अंमलदाराच्या उपस्थितीत सुरू होणार आहे. या चौकीचे सुशोभीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून, शनिवारी (ता.१) पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यासह आमदार सीमा हिरे यांनी चौकीची पाहणी करत आढावा घेतला.
हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??
गेल्या अनेक वर्षांपासून होत असलेली मागणी आता पूर्ण होत असल्याने अंबड ग्रामस्थांसह उद्योजकांनी समाधान व्यक्त केले आहे, आता खऱ्या अर्थाने गुन्हेगारीवर नियंत्रण मिळेल अशी अपेक्षा वर्तविण्यात येत आहे. या वेळी पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, पोलिस उपायुक्त गुन्हे शाखेचे प्रशांत बच्छाव, अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सूरज, यांच्यासह भाजपचे रश्मी हिरे, माजी नगरसेवक राकेश दोंदे, सामाजिक कार्यकर्ते अंकुश वराडे, रामदास दातीर, सहायक पोलिस निरीक्षक वसंत खतेले, उपनिरीक्षक संदीप पवार, उपनिरीक्षक उत्तम सोनवणे आदी उपस्थित होते.
"नवीन पोलिस ठाण्याचा प्रस्ताव गृहविभागाकडे आहे. लवकरच या प्रस्तावाला मंजुरी मिळणार आहे. तोपर्यंत अंबड औद्योगिक वसाहत पोलिस चौकी येथे पोलिस ठाण्याप्रमाणे कामकाज चालणार आहे. या चौकीचे उद्घाटन १० एप्रिलला सायंकाळी होणार आहे." - सीमा हिरे, आमदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.