Nashik Police Transfer: अंबडचे प्रमोद वाघ पुन्हा ‘कंट्रोल’ला! अंबड पोलीस ठाण्याचे ग्रहण सुटेना; महिनाभरात पुन्हा बदली

Transfer of Ambad Police Inspector pramod Wagh nashik news
Transfer of Ambad Police Inspector pramod Wagh nashik newsesakal
Updated on

नाशिक : अंबड पाेलिस ठाण्यामागील वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदाचे ग्रहण काही सुटता सुटेना झाले आहेत. अंबडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांची पुन्हा आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.

वाघ यांची अंबड पोलीस ठाण्यातून पाच महिन्यात दोन वेळा बदली करण्यात आली आहे. बदलीमागील कारण गुलदस्त्यात असले तरी, दोन दिवसांपूर्वी पवननगर परिसरात झालेल्या गोळीबारप्रकरणात वाघ यांची बदली झाल्याचे बोलले जाते. (Ambad Senior Police Inspector Pramod Wagh transferred back to control room of Commissionerate nashik)

प्रमोद वाघ यांची गेल्या जुलै महिन्यात अंबड पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती.

त्यानंतर गेल्या नोव्हेंबर महिन्यात सिडको परिसरात झालेल्या सकल मराठा आंदोलनावेळी आमदार सीमा हिरे यांच्या कार्यालयास ताळे ठोकल्याप्रकरणी कारवाई करण्यात विलंब केल्याप्रकरणी तत्कालिन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी प्रमोद वाघ यांनी चौकशीच्या नावाखाली आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षात बदली केली होती.

मात्र, आठवडाभरानंतर १२ नोव्हेंबर रोजी पुन्हा अंबड पोलिस ठाण्याची त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली होती. त्यावेळी सिंगम रिटर्नचे संदेशही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

परंतु या बदलीला महिना उलटत नाही तोच, पुन्हा वाघ यांची आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.

वाघ यांच्या बदलीमागे गेल्या दोन दिवसांपूर्वी पवननगर परिसरात झालेल्या गोळीबाराचे कारण सांगितले जात आहे. दरम्यान, अंबड पोलीस ठाण्याचा पदभार सध्या पाेलीस निरीक्षक नजन पाटील यांच्याकडे देण्यात आलेला आहे.

Transfer of Ambad Police Inspector pramod Wagh nashik news
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांना पुन्हा समन्स, गुरुवारी चौकशीला बोलावलं

अकरा महिन्यात सात अधिकारी

गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशनामध्ये तत्कालिन पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्याविरोधातील तक्रारींचा पाढा आमदार नितेश राणे यांना वाचला आणि चौकशीची मागणी केली होती.

त्यावरून गेल्या जानेवारी महिन्यात देशमुख यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. त्यानंतर नंदन बागडे यांच्याकडे पदभार दिला. परंतु अवघ्या तीन आठवड्यात युवराज पत्की यांच्याकडे पदभार देण्यात आला.

काही महिने होत नाही तोच पुन्हा बदली करीत सुरज बिजली यांना नियुक्त केेले. बिजली यांची काही महिन्यातच पदोन्नतीने बदली झाल्याने प्रमोद वाघ यांच्याकडे गेल्या जुलै महिन्यात पदभार देण्यात आला.

मात्र गेल्या महिन्यात सकल मराठा आंदोलनावेळी तत्कालीन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी वाघ यांची चौकशीकामी नियंत्रण कक्षात बदली केली. यानंतर आठवडाभरात पुन्हा त्यांना अंबडमध्ये नियुक्त करण्यात आले.

पोलीस निरीक्षक नजन पाटील यांच्याकडे पदभार दिला होता. या बदलीला महिना होत नाही तोच, पुन्हा त्यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून पुन्हा नजन पाटील यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला आहे.

Transfer of Ambad Police Inspector pramod Wagh nashik news
Mohol News : खा. धनंजय महाडिक यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना दिले कोल्हापूर भेटीचे आमंत्रण, केला सन्मान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.