Ambadas Danve News: नाशिकची पोलिस यंत्रणा झोपली होत का? : अंबादास दानवे

Ambadas Danve, Leader of the Opposition in Legislative Council, discussing with Police Commissioner Ankush Shinde regarding the drug issue. Along with former minister Baban Gholap.
Ambadas Danve, Leader of the Opposition in Legislative Council, discussing with Police Commissioner Ankush Shinde regarding the drug issue. Along with former minister Baban Gholap.esakal
Updated on

Ambadas Danve News : प्रत्येक शहरात लपूनछपून अमलीपदार्थांची विक्री होते. परंतु नाशिकच्या पावन शहरात मुंबई पोलिस येऊन एमडी ड्रग्ज‌चा कारखानाच उद्‌ध्वस्त करतात. याचा अर्थ नाशिक पोलिसांची गुप्तचर यंत्रणा फेल ठरली.

कोट्यवधींचा ड्रग्ज साठा आणि एकापेक्षा अधिक कारखाने सुरू असताना नाशिकची पोलिस यंत्रणा झोपली होती का, असा परखड सवाल करीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. (Ambadas Danve News statement police system of Nashik sleeping md drug case nashik)

नाशिकमधील एमडी ड्रग्ज कारखान्यांवरील कारवाईबाबतची माहिती घेण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी (ता. १६) सकाळी पोलिस आयुक्तालयात आयुक्त अंकुश शिंदे यांची भेट घेतली.

या वेळी माजी मंत्री बबन घोलप, माजी आमदार वसंत गिते, सुनील बागूल, विनायक पांडे, सुधाकर बडगुजर यांच्यासह शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.

एमडी ड्रग्जचा मास्टरमाईंड ललित पाटील हा पुण्याच्या ससून रुग्णालयात पसार झाल्यामुळे नाशिकमधील ड्रग्जच्या कारखान्यांचे बिंग फुटल्याचे अंबादास दानवे म्हणाले. नाशिकची भूमी पावन आहे.

मात्र गेल्या काही दिवसातील घडामोडीतून हे शहर राज्यातील एमडी ड्रग्जचे केंद्रबिंदू बनले आहे. नाशिक रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिंदे गावात सुरू असलेला एमडी ड्रग्ज कारखान्यावर मुंबईचे पोलिस येऊन कारवाई करतात तरीही स्थानिक नाशिक पोलिसांना माहीत नसते.

याचा अर्थ नाशिक पोलिसांची गुप्तचर यंत्रणा पुरती फेल ठरली आहे. याप्रकरणी आयुक्तांशी चर्चा करताना त्यांनी सखोल तपास सुरू असल्याचे सांगितले.

Ambadas Danve, Leader of the Opposition in Legislative Council, discussing with Police Commissioner Ankush Shinde regarding the drug issue. Along with former minister Baban Gholap.
Nashik News: नाशिक मेडिकल टुरिझम हब करा; क्रेडाई मेट्रोची केंद्रीय आरोग्य मंत्र्याकडे मागणी

केमिकल कंपन्यांसाठी पुरवला जाणारे ड्रग्ज, शाळा-महाविद्यालये, साखर कारखान्यांना दिले जाणारे ड्रग्ज या माफियांकडे आला कसा, हे शोधणे पोलिसांचे काम आहे. परंतु प्रकरणाची समूळ चौकशी करून रॅकेट उघड करून नवतरुणांना या विळख्यातून वाचवले पाहिजे, असेही श्री. दानवे म्हणाले.

कोणीही असो, सोडू नका

नाशिक शहर एमडी ड्रग्जची फॅक्टरीच असल्याचे सध्याचे चित्र आहे. या प्रकरणात ड्रग्ज माफियांसह जर राजकीय लागेबांधे असतील तर त्यांनाही उघडे पाडा आणि त्यांच्यावरही कारवाई पोलिसांनी केली पाहिजे.

या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन कारवाई करण्याची आवश्यकता आहे. ललित पाटील ससूनमधून पळाल्याने हे सारे प्रकरण उजेडात आले आहे.

शहरासाठी, राज्यासाठी व तरुणांसाठी ही अत्यंत गंभीर असून, पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशा सूचना दिल्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले

Ambadas Danve, Leader of the Opposition in Legislative Council, discussing with Police Commissioner Ankush Shinde regarding the drug issue. Along with former minister Baban Gholap.
Nashik News: शहरातील सर्वच फेरीवाल्यांना संरक्षण कवच; फेरीवाला समितीच्या बैठकीत निर्णय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()