Nashik Crime: गुन्हेगारी रोखण्यासाठी अंबडला जादा कुमक; सरकारवाडा, गुन्हे शाखांनाही मनुष्यबळ

police
policeesakal
Updated on

Nashik Crime : गेल्या महिन्याभरात अंबड पोलिस ठाण्यांतर्गत खून, प्राणघातक हल्ले, गाड्यांची तोडफोड यासारख्या घटना घडल्या. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्तांनी अंबड पोलिस ठाण्यासाठी जादा मनुष्यबळाची कुमक दिली आहे.

यामुळे पोलिस ठाण्याचे मनुष्यबळ वाढून पोलिसांना कारवाई करण्यास वेग मिळणार आहे. दरम्यान, अंबडप्रमाणेच, सरकारवाडा पोलिस ठाणे व गुन्हे शाखांनाही वाढीव मनुष्यबळ मिळाले आहे. (Ambadla Jada Kumak to prevent crime Sarkarwara crime branches also manpower Nashik Crime)

अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीच्या तुलनेत तेथील उपलब्ध मनुष्यबळाचा प्रश्न नेहमीच चर्चेला येत असतो. वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे अंबड पोलिस ठाणे पुन्हा चर्चेत आले.

दरम्यान, आयुक्त अंकुश शिंदे यांनी नुकताच पोलिस ठाण्याच्या आढावा घेतला असता, काही चौक्या व पोलिस ठाण्यातील काही अंमलदारांची तडकाफडकी मुख्यालयाच्या मोटार वाहन विभागात बदल्या केल्या होत्या.

यातील काही अधिकारी- अंमलदारांना दंगल नियंत्रण पथकात नेमलेले होते. आयुक्तांनी वाढत्या गुन्हेगारीबाबत नव्याने आढावा घेतला. त्यानंतर गुन्हेगारी कृत्यांचा बीमोड करण्यासह पोलिसांचा वचक वाढविण्यासाठी रिक्त जागांवर अंमलदार नियुक्त करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

police
Jalgaon Crime: भावना लोढासह 5 अट्टल गुन्हेगारांची हद्दपारी; चोऱ्या- घरफोड्यांसह भामटेगिरीत महिलेची गँग अव्वल

त्यानुसार, मोटार परिवहन विभागात कार्यरत असलेल्या २३ पोलिस अंमलदारांना सरकारवाडा, अंबड आणि गुन्हे शाखेत हजर होण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे पोलिसांच्या कारवाईला वेग वाढण्यास व गुन्हेगारीला आळा बसण्यास मदतच होणार आहे.

पोलिस ठाणे : नियुक्त अंमलदार

सरकारवाडा : १० अंमलदार

अंबड : १० अंमलदार

गुन्हे शाखा : ३ अंमलदार

police
Solapur Crime : वास्तुशांतीला गेल्यावर घरफोडी; घरात प्रवेश करून बेडरूममधील...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.