Cyber Crime : नाशिक पालिकेचा डेटा चोरण्याचा अमेरिकन हॅकरचा प्रयत्न

आयटी कर्मचाऱ्यांचे २४ तासांचे अथक प्रयत्न यशस्वी
American hacker attempt to theft data of Nashik Municipality
American hacker attempt to theft data of Nashik Municipality
Updated on

नाशिक : महापालिका हद्दीतील नागरिकांसह, कर्मचारी व पालिकेशी संबंधित महत्त्वाचा डेटा क्रॅक करून संपूर्ण संगणक यंत्रणा ठप्प करण्याचा एका अमेरिकन हॅकरचा प्रयत्न माहिती व तंत्रज्ञान (आयटी) विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हाणून पाडला. फायर वॉलवर चोवीस तास टकटक करून त्रस्त करणाऱ्या हॅकरला पळवून लावण्यास आयटी कर्मचाऱ्यांचे २४ तासांचे अथक प्रयत्न यशस्वी झाले.

गेल्या आठवड्यात संगणक यंत्रणा हॅक करण्याचा प्रयत्न झाला होता. आठवडाभर याची वाच्यता झाली नाही. महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सायबर पोलिसात तक्रारीची सूचना दिल्यानंतर या घटनेची माहिती सर्वत्र झाली.

संगणक नेटवर्कमध्ये व्हायरस घुसल्याने संगणकीय यंत्रणा ठप्प झाली होती. ‘ग्लोबल आयपी ॲड्रेस’ तपासणीनंतर अमेरिकन हॅकर असल्याचे लक्षात आले. आयटी विभागाच्या यंत्रणेने चोवीस तास प्रयत्न करून हॅकरला पळवून लावले.

महापालिकेच्या संगणक नेटवर्कमध्ये व्हायरस हटविण्याचे काम चोवीस तास सुरु होते. आयटी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मेहनत घेऊन हॅकर व व्हायरस हटविला ही बाब कौतुकास्पद आहे.

- डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, आयुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.