Nashik : जागतिक योगा दिनानिमित्त अमित शहा जिल्हा दौऱ्यावर

Amit Shah
Amit Shahesakal
Updated on

नाशिक : जागतिक योगा दिनानिमित्त (World Yoga Day) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Central Homeminister Amit Shah) हे नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharati Pawar) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांकडून तयारीचा आढावा घेत आवश्‍यक त्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. (Amit Shah on district tour on occasion of World Yoga Day Nashik News)

या वेळी आमदार राहुल ढिकले, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., मुंबईचे केंद्रीय राखीव पोलिस दलाचे महानिरीक्षक रणदीप दत्ता, जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषद मुख्‍य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नरसिकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश बागूल, उपजिल्हाधिकारी नितीन मुंढावरे, गणेश मिसाळ, नीलेश श्रींगी, वासंती माळी, पोलिस उपायुक्त अमोल तांबे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी. एन. गांगुर्डे, प्रांताधिकारी तेजस चव्हाण, अर्चना पठारे, संदीप आहेर यांच्यासह केंद्रीय रिर्झव पोलिस दलाचे अधिकारी देखील उपस्थित होते.

२१ जूनला योगा दिनानिमित्त देशातील ७५ निवडक ठिकाणी मंत्र्यांच्या उपस्थितीत हा दिन साजरा केला जाणार आहे. त्याअनुषंगाने गृहमंत्री अमित शाह हे २१ जूनला नाशिक जिल्हा दौऱ्यावर येणार आहे. त्र्यंबकेश्‍वर येथील गुरूपीठ परिसरात गृहमंत्री अमित शहा हे योगा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. यानिमित्त केंद्रीय राखीव पोलिस दलाकडून सुरक्षिततेचा आढावादेखील डॉ. पवार यांनी घेतला. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून याठिकाणी काय उपाययोजना करण्यात येत आहे, याची माहिती डॉ. पवार यांनी घेत या कार्यक्रमाचे सर्व यंत्रणांनी समन्वयाने काटेकोरपणे नियोजन करावे.

Amit Shah
घरफोड्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना अटक; 14 गुन्ह्यांची उकल

कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणासाठी अखंडित वीजपुरवठा, वेगवान इंटरनेटची सुविधा अबाधित ठेवण्यात यावी, अशा सूचना दिल्या. तसेच, यादिवशी सकाळी अमित शहा यांच्यासोबत केवळ १५० लोकांनाच मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार आहे. याठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वॉटरप्रुफ पेंडाल बांधण्याची तयारीदेखील सुरू केली आहे. २१ जूनला सकाळी साडेपाचपासून कार्यक्रमांना सुरवात होणार आहे. यामध्ये साडेसहा ते सातपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वांना ऑनलाइन माध्यमातून संबोधित करतील. त्यानंतर पुढील ४५ मिनिटे योगाची प्रात्यक्षिके केली जाणार आहे. यानंतर गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर येथील गुरुपिठात सदगुरू मोरेदादा रुग्णालय कोनशिलेचा उद्‌घाटन सोहळा होईल.

Amit Shah
Nashik : तब्बल 821 दिवसांनंतर फाळके स्मारक खुले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()