नाशिक दौऱ्यावेळी अमित ठाकरे नाराज; आयुक्तांशीही संवाद टाळला

amit thackeray
amit thackerayesakal
Updated on

नाशिक : स्थापनेनंतर राज्यभरात मनसेचा (MNS) झंझावात सुरू झाला. या झंझावातात नाशिककरांनी मनसेच्या हाती महापालिकेची सत्ता दिली. २०१२ ते १७ या कालावधीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जातीने लक्ष घालत स्वतःच्या ओळखीने नाशिक शहरात सामाजिक दायित्वाच्या निधीतून विविध प्रकल्प साकारले. मनसेच्या (MNS) सत्ताकाळात सामाजिक दायित्वाच्या निधीतून प्रकल्प उभारण्यात आले. त्यानंतरच्या महापालिकेच्या निवडणुकीत भाजपची सत्ता आल्यानंतर राज ठाकरे (raj thackeray) यांचा नाशिकशी दुरावा निर्माण झाला. मात्र, आता सहा महिन्यांनी महापालिकेच्या निवडणुका असल्याने पक्षसंघटना बांधणीसाठी राज ठाकरे यांचे दौरे वाढले आहेत. त्यात मुलगा अमित यांना राजकारणाचे धडे गिरविण्यासाठी नाशिकची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्या अनुषंगाने अमित यांचा दुसरा दौरा बुधवार (ता. २८)पासून सुरू झाला. त्यावेळी नाराज झालेल्या अमित यांनी महापालिका आयुक्तांची भेट न घेताच थेट पक्षाचे राजगड कार्यालय गाठले. नेमके काय कारण होते...वाचा...(Amit-Thackeray-distressed-avoided-communication-with-commissioner-jpd93)

याचसाठी अट्टाहास केला का? - अमित ठाकरे

मनसेच्या (MNS) सत्ताकाळात सामाजिक दायित्वाच्या निधीतून उभारण्यात आलेले प्रकल्प महापालिकेकडे हस्तांतरित झाल्यानंतर सत्ताधारी भाजपसह प्रशासनाने लक्ष देऊन काळजीपूर्वक जतन करण्याची आवश्‍यकता होती; परंतु गेल्या साडेचार वर्षांत प्रकल्पांच्या दुरवस्थेने याचसाठी अट्टाहास केला का, अशी संतप्त प्रतिक्रिया मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी प्रकल्पांच्या दुरवस्थेची पाहणी केल्यानंतर व्यक्त केली. प्रकल्पांची दुरवस्था पाहून नाराज झालेल्या अमित यांनी महापालिका आयुक्तांची भेट न घेताच थेट पक्षाचे राजगड कार्यालय गाठले. २०१२ ते १७ या कालावधीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जातीने लक्ष घालत स्वतःच्या ओळखीने नाशिक शहरात सामाजिक दायित्वाच्या निधीतून विविध प्रकल्प साकारले. त्यात रिलायन्सच्या माध्यमातून गोदा पार्क, टाटा ट्रस्टतर्फे बॉटॅनिकल गार्डन, महिंद्रतर्फे मुंबई नाका येथे चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्क, एल ॲन्ड टी कंपनीकडून मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलाखाली सुशोभीकरण, शहरातील बांधकाम व्यावसायिकांच्या माध्यमातून वाहतूक बेटांचा विकास, बी. जी. शिर्के कंपनीकडून अहिल्यादेवी होळकर पुलावर रंगीत-संगीत धबधबा, जीव्हीके कंपनीच्या माध्यमातून गंगापूर रोडवरील जुने पंपिंग स्टेशन येथे (स्व.) बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालय या महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश होता. दौऱ्याच्या अनुषंगाने अमित ठाकरे यांनी मनसेच्या सत्ताकाळातील प्रकल्पांची पाहणी गुरुवारी केली.

आयुक्तांशी भेट टाळली

प्रकल्पांच्या पाहणीनंतर अमित ठाकरे महापालिका आयुक्त कैलास जाधव यांची भेट घेणार होते, परंतु त्यांनी भेट टाळत थेट पक्षाचे राजगड कार्यालय गाठले. त्यांच्याऐवजी पक्षाचे प्रवक्ते संदीप देशपांडे, चित्रपट सेनेचे अमेय खोपकर यांनी चर्चा करीत प्रकल्पांची दुरवस्था थांबविण्याची विनंती केली. प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी, दिलीप दातीर, शहराध्यक्ष अंकुश पवार आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

या प्रकल्पांना दिली भेट

चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क येथील भेटीत प्रकल्पाच्या अडचणी समजून घेतल्या. महापालिकेकडून रेडीरेकनर दराने जागेच्या भाड्याची आकारणी होत असल्याने आर्थिकदृष्ट्या प्रकल्प चालविता येत नसल्याची व्यथा मांडली. बॉटॅनिकल गार्डनमधील आर्टिफिशल प्राणी, उद्यानाची दुरवस्था बघितली. मुकणे धरण थेट पाणीपुरवठा योजना, शस्त्र संग्रहालयाची पाहणी केली. या वेळी ज्येष्ठ नागरिकांनी दुरवस्थेबाबत तक्रारी केल्या. वीस रुपये प्रतिव्यक्ती भाडे आकारणी होते, परंतु सुविधा महापालिकेकडून पुरविल्या जात नसल्याची माहिती दिली. या भागात स्वच्छता केली जात नसल्याची प्रमुख तक्रार करण्यात आली. प्रकल्पांच्या दुरवस्थेवर अमित यांनी नाराजी व्यक्त करीत महापालिकेकडे तक्रारी मांडण्याचा निर्णय घेतला

amit thackeray
नाशिक : धरणातून विसर्गामुळे पाणी कपात मागे, सोमवारी होणार निर्णय
amit thackeray
नाशिक शहर बससेवेची धाव आता ओझर, सिन्नरपर्यंत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.