नाशिक : कोविड(corona virus) पश्चात म्युकरमायकोसिस(Mucormycosis) रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होते आहे. या बुरशीजन्य आजारावर उपचारार्थ लागणाऱ्या एमफोटेरेसिन बीचा(Amphotericin- B) तुटवडा गेल्या काही दिवसांपासून जाणवतो आहे. या पार्श्वभूमीवर या इंजेक्शनचे वितरण आता प्रशासकीय यंत्रणेच्या निगराणीत केले जाणार असल्याचा निर्णय जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी घेतला आहे. त्यानुसार नाशिक व मालेगाव महापालिका क्षेत्र व नाशिक ग्रामीण असे तीन क्षेत्रनिहाय अधिकाऱ्यांवर वितरणाची जबाबदारी निश्चित केली आहे. (Amphotericin B distribution under administrative supervision)
वितरण समन्यायी पद्धतीने व्हावे!
यासंदर्भात जिल्हाधिकारी मांढरे यांनी मंगळवारी (ता. १८) आदेश पारीत केले असून, ‘एमफोटेरेसिन बी’(Amphotericin- B) या इंजेक्शनच्या वितरण व्यवस्थेची सविस्तर माहिती नमूद केली आहे. यापूर्वी रेमडेसिव्हिर(Remdesivir) व टॉसिलीझुमॅब(Tocillizumab) या इंजेक्शनप्रमाणेच आता एमफोटेरेसिन बी(Amphoterecin- B) इंजेक्शनचेही वितरण केले जाईल. जिल्ह्यातील खासगी औषध वितरकांकडे वेळोवेळी प्राप्त इंजेक्शनची उपलब्धतेसह व शासकीय खरेदीसह प्राप्त एमफोटेरेसिन बी इंजेक्शनच्या साठ्याचे जिल्ह्यांतर्गत वितरणदेखील जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांमध्ये समन्यायी पद्धतीने व्हायला हवे. यादृष्टीने यापूर्वी रेमडेसिव्हिर, टॉसिलीझुमॅब या औषध वितरणासाठी ठरविण्यात आलेली नाशिक महापालिका, मालेगाव महापालिका व नाशिक ग्रामीण अशा तीन भागांमध्ये करण्यात आलेली जिल्ह्याची विभागणी कायम ठेवण्यात येत आहे.
या आहेत महत्त्वाच्या बाबी
एखाद्या क्षेत्रात मागणी कमी असल्यास त्या भागातील शिल्लक असलेली इंजेक्शनचे जास्त मागणी असलेल्या भागांमध्ये उधारी तत्त्वावर घेण्याची मुभा संबंधित सक्षम अधिकाऱ्याला दिली आहे. यापूर्वी राज्यस्तरावर प्राप्त सूचनांनुसार एक किंवा दोन दिवसांकरिताच्या उपचारासाठीचे इंजेक्शन उपलब्ध करून दिले जातील. यासंदर्भात रुग्णालयांनी प्रशासकीय यंत्रणेकडे रोज इंजेक्शनची मागणी नोंदवायची आहे. इंजेक्शनच्या योग्य वापरावर निगराणी ठेवण्यासाठी पथके स्थापन केली असून, रुग्णालयास झालेले वाटप व वापर तपासावे व त्रुटी आढळल्यास योग्य ती कार्यवाही केली जाणार आहे.
या अधिकाऱ्यांवर असेल जबाबदारी
नाशिक महापालिका क्षेत्राकरिता नाशिक महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्यावर, तर नाशिक ग्रामीण क्षेत्राकरिता जिल्हा शल्यचिकित्सक, मालेगाव महापालिका क्षेत्राकरिता मालेगाव महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्यावर इंजेक्शन वितरणाची जबाबदारी असेल. उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर यांना घटना व्यवस्थापकपदाची जबाबदारी सोपविली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.