नाशिक : देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांसाठी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना जाहीर केली होती. याअंतर्गत महामंडळाच्या बसगाड्यांतून या सुपर सिनियर्सला मोफत प्रवासाची सवलत उपलब्ध केली आहे.
ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान नाशिक विभागातील बसगाड्यांनी ११ लाख ३३ हजार ५१ सुपर सिनियर्स प्रवाशांनी मोफत प्रवासाचा लाभ घेता आहे. दैनंदिन सरासरी काढल्यास सुमारे नऊ हजार सुपर सिनियर्स रोज या योजनेचा लाभ घेताय. (Amrit Senior Citizen Scheme msrtc bus Benefit of free travel for 9 thousand super seniors everyday nashik news)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे गेल्यावर्षी २६ ऑगस्टपासून योजना लागू केलेली होती. अगदी पहिल्या महिन्यापासून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. योजनेच्या शुभारंपासून ३१ डिसेंबर अशा चार महिन्यांच्या कालावधीत एकूण ११ लाख ३३ हजार ५१ ज्येष्ठ नागरिक प्रवाशांनी योजनेचा लाभ घेत मोफत प्रवास केलेला आहे.
अर्थात एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने एक टप्पा ते दुसरा टप्पा प्रवास केला असेल तर एक प्रवासी आणि परतीचा मार्ग किंवा पुढील टप्यात प्रवास केला असल्यास संबंधिताची गणना आणखी एक प्रवासी असे दोन लाभार्थी अशी होते.
महामंडळाच्या माध्यमातून याआधी २९ विविध सामाजिक घटकांना ३३ टक्कांपासून शंभर टक्के प्रवासी भाडे सवलत दिली जाते. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, दिव्यांग, कर्करोग व इतर दुर्धर आजारग्रस्त, स्वातंत्र्यसैनिक, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना, डॉ. आंबेडकर समाजभूषण पुरस्कारप्राप्त, अधिस्वीकृतीधारक आदींना सवलतीत प्रवास उपलब्ध आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ वर्षीय व त्यापुढील ज्येष्ठ नागरिकांना सर्व प्रकारच्या बसमध्ये मोफत प्रवास सवलत योजना लागू आहे.
अगदी पहिल्या दिवसापासून योजनेला नाशिक विभागात चांगला प्रतिसाद मिळत आहे. योजनेचा प्रसार होत असताना लाभार्थी प्रवाशांच्या संख्येत वाढ होत चाललेली आहे.
महिनानिहाय योजनेचा लाभ घेतलेल्या प्रवाशांची संख्या-
ऑगस्ट २०२२- १५ हजार ५०२
सप्टेंबर २०२२- २ लाख १५ हजार ३८९
ऑक्टोबर २०२२- २ लाख ६१ हजार ६५७
नोव्हेंबर २०२२- ३ लाख १० हजार ४००
डिसेंबर २०२२- ३ लाख ३० हजार १०३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.