Amruta Fadanvis : आम्ही ब्राह्मण आहोत याचा गर्व पण मार्केटिंग करता येत नाही : अमृता फडणवीस

Amruta Fadanvis
Amruta Fadanvisesakal
Updated on

नाशिक : ब्राह्मण महासंघ जात- धर्म, पंथ बाजूला ठेऊन अनेकांसाठी झटतो. लोकांमध्ये जाऊन त्यांच्या इच्छा-आकांक्षा समजून घेत आहेत. ब्राह्मण असल्याचा गर्व आहे, परंतु आम्हाला आमची मार्केटिंग करता येत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी पदासाठी कोणतीही मागणी केली नसताना ते मिळाले आहे. यापुढे बहुभाषिक ब्राह्मण महासंघापुढील अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे आश्‍वासन अमृता फडणवीस यांनी सोमवारी (ता. १४) स्नेहमेळाव्यातून ब्राह्मण समाजाला दिले. (Amruta Fadanvis statement about her religion nashik news)

नवीन आडगाव नाक्यावरील स्वामिनारायण बॅक्वेंट हॉलमध्ये सोमवारी सायंकाळी अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघातर्फे ‘दीपावली स्नेहमिलन २०२२’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून अमृता फडणवीस समाजाला आश्‍वस्त केले. मेळाव्यास समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमृता फडणवीस पुढे म्हणाल्या, की प्रभू श्रीरामाचे नाशिकला चरण लागले.

या नगरीत येऊन मला धन्य वाटते आहे. याच पंचवटीत गेल्या बारा वर्षांपासून समाजाच्या इमारतीचे बांधकाम रखडले आहे. त्या कामाची जबाबदारी डॉ. भारती पवार यांच्यासह स्थानिक आमदार यांच्यावर सोपवते. नेशन फर्स्ट हे आपले ब्रीद असल्याने, शुक्ल यजुर्वेद संस्थेची इमारत उभी करण्यासाठी कोण मध्ये येतो ते मी बघते. जे अधिकारी हे काम थांबवत आहेत त्यांची नावे मला कळवा मी पुढे बघते, असा दमही त्यांनी भरला. गंगा- गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

Amruta Fadanvis
PFI Case : मालेगावातील मौलानास ATSकडून अटक; Social Mediaवर चिथावणीखोर संदेश

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश मुळे, आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, माजी महापौर सतीश कुलकर्णी, अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे अध्यक्ष ॲड. अविनाश भिडे, महंत भक्तिचरणदास महाराज, अनिकेतशास्त्री देशपांडे, त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, भगवान पाठक यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी श्री. शुक्ल यांनी मांडलेल्या १२ ठरावांना उपस्थितांनी जोरदार पाठिंबा दर्शवीत अनुमोदन दिले.

कार्यक्रमाची सुरवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने झाली. नृत्यानंद कथक कला केंद्राच्या कलाकारांनी गणेशवंदना सादर केली. स्मार्त चुडामणी शांताराम शास्त्री भानोसे व कैलास मठ येथील विद्यार्थी यांनी वैदिक वेदमंत्र मंगलाचरण पठण केले. प्रास्ताविक ॲड. भानुदास शौचे यांनी केले. सूत्रसंचालन अलका चंद्रात्रे यांनी तर आभार भगवान पाठक यांनी मानले.

Amruta Fadanvis
Nashik | रामकुंड नव्हे रामतीर्थ!; गोदावरी सुशोभीकरणाला हवी गती!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.