Gurumauli Annasaheb More : घरोघरी घडवा पुंडलिक अन् श्रावणबाळ! गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचे आवाहन

Gurumauli Annasaheb More during weekly satsang ceremony. In front, devotees from all over the state, sevakeri
Gurumauli Annasaheb More during weekly satsang ceremony. In front, devotees from all over the state, sevakeriesakal
Updated on

Gurumauli Annasaheb More : मूल्यसंस्काराच्या माध्यमातून घराघरांत पुंडलिक आणि श्रावणबाळ घडविण्याचे आवाहन करीत तसे झाल्यास देशात कर्तृत्ववान सदाचारी आणि संस्कारक्षम पिढी निर्माण होईल.

त्यातून देश अधिक प्रगतिपथावर जाईल असे प्रतिपादन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी केले. (An appeal of gurumauli to create Pundalik and Shravanbal through value rituals nashik news)

श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील गुरुपीठात शनिवारी (ता.८) साप्ताहिक सत्संग समारोहासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने आलेल्या सेवेकऱ्यांशी गुरुमाऊलींनी हितगूज साधले. गुरुमाऊली म्हणाले की, शिक्षणाला संस्काराची जोड आवश्यक आहे. मुले उच्चविद्याविभूषित झाली म्हणजे संस्कारक्षम झाली असा अर्थ होत नाही.

त्याकरिता संस्कार अंत:करणावर रुजवावे लागतात. संस्कार केले तर संस्कृती टिकेल आणि संस्कृती टिकली तर धर्म टिकेल. धर्म टिकला तर राष्ट्र टिकेल हे सूत्र सेवेकऱ्यांनी लक्षात घ्यावे. त्याकरिता सेवेकऱ्यांनी मूल्यशिक्षणावर भर देणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या हातून एकवेळ सेवा कमी झाली तरी चालेल मात्र प्रत्येक घराघरांत श्रावणबाळ आणि पुंडलिक घडविण्यासाठी योगदान द्या असे आवाहन त्यांनी केले.

मूल्यशिक्षणाचे महत्त्व स्पष्ट करताना गुरुमाऊलींनी म्हणाले,‘ आजी-आजोबांची मांडी हे नातवंडाचे विद्यापीठ आहे. या विद्यापीठात बसूनच मुले संस्काराचे धडे गिरवत असतात. वीर पुरुषांच्या शौर्य कथा, प्राचीन इतिहास, अनेक संदर्भ, स्तोत्र, मंत्र आजी-आजोबांच्या मांडीवर बसूनच नातवंडे ऐकत असतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Gurumauli Annasaheb More during weekly satsang ceremony. In front, devotees from all over the state, sevakeri
Gurumauli Annasaheb More : माळकरी, टाळकरी अन् वारकरी हे धर्म, देश, संस्कृतीचे रक्षक : गुरुमाउली

त्यातून संस्कारक्षम पिढी घडत असते. आज अशा सुसंस्कारांचीच सर्वाधिक गरज आहे. देशात वाढत जाणाऱ्या वृद्धाश्रमांची संख्या आपणाला कमी करायची आहे. त्याकरिता मूल्यसंस्कार गावागावात, वाड्या-वाड्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे असे गुरुमाऊलींनी नमूद केले.

येत्या १८ जुलैपासून अधिक श्रावणमास सुरु होत असून घरच्याघरी श्रीमद् भागवत ग्रंथाचे वाचन केले तर भगवंत प्रसन्न होईल. बाहेर कुठेही पर्यटन करण्यापेक्षा गुरुपीठात किंवा आपापल्या घरी सेवा करावी अशी स्पष्ट सूचना गुरुमाऊलींनी केली.

आगामी काळात शहीद जवान आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे सामूहिक विवाह सोहळे आयोजित केले जाणार आहे. सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून सेवेकऱ्यांनी योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले.

Gurumauli Annasaheb More during weekly satsang ceremony. In front, devotees from all over the state, sevakeri
Gurumauli Annasaheb More : पुरुषोत्तम पूजनाची सेवेकऱ्यांना पर्वणी; गुरुपीठात 22 जुलैला अपूर्व पूजन सोहळा

विषारी फवारणीमुळे असाध्य आजार निर्माण होतात, त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वत: बियाणे उत्पादित करून सेंद्रिय शेती करावी असे सांगून गुरुमाऊलींनी निरोगी जीवन जगण्यासाठी जिभेवर नियंत्रण ठेवावे असा सल्ला दिला. सेवामार्गातर्फे वाडया वस्त्यांवर मोफत औषधोपचार, वस्त्रदान, केंद्रा-केंद्रात वैयक्तिक-कौटुंबिक समस्यांवर प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विनामूल्य समुपदेशन केले जाते.

विवाह मंडळे, कायदेशीर सल्लागार विभाग, दुर्ग संवर्धन, पर्यावरण प्रकृती, बालसंस्कार-युवा प्रबोधन, देश-विदेश अभियान असे बहुविध उपक्रम सामाजिक बांधिलकीच्या नात्याने राबविले जातात अशी माहिती गुरुमाऊलींनी दिली. यावेळी ठाण्याचे जिल्हाधिकारी शिनगारे, राहुरीच्या माजी नगराध्यक्षा उषाताई तनपुरे, नाशिकचे सिव्हिल सर्जन डॉ. थोरात, गुरुपुत्र चंद्रकांतदादा मोरे व नितीनभाऊ मोरे, आबासाहेब मोरे हेही उपस्थित होते.

Gurumauli Annasaheb More during weekly satsang ceremony. In front, devotees from all over the state, sevakeri
Gurumauli Annasaheb More : भारतीय स्त्री सद्गुणांची खाण : गुरूमाउली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.