नामपूर (जि. नाशिक) : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी मान्यताप्राप्त शाळांमध्ये राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री पोषण निर्माण शक्ती योजनेंतर्गत कार्यरत स्वयंपाकी, मदतनीस यांच्या मानधनात एक हजार रुपयाची वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने गुरुवारी (ता. ९) घेतला.
शाळांमधील स्वयंपाकींच्या मानधन वाढीबाबत प्रधान सचिव नंदलाल समितीने दरमहा पाच हजार रुपयांची शिफारस केलेली असताना शासनाने मात्र हजार रुपयांची वाढ केली आहे. आता दोन हजार ५०० रुपये मानधन मिळणार आहे. (An increase of 1 thousand in salary of cooks in schools Nutrition diet nashik news)
स्वयंपाकी महिलांना सुरवातीला दरमहा एक हजार रुपये महिना मानधन अदा केले जात होते. प्राथमिक शिक्षक संघटना, आयटक संघटना यांच्या मागणीनुसार वाढत्या महागाईमुळे एप्रिल २०१९ पासून दरमहा एक हजार ५०० रुपये एवढे मानधन अदा करण्याचा निर्णय शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.
त्यात केंद्र शासनाचा हिस्सा ६०० रुपये, तर राज्य शासनाचा हिस्सा ९०० रुपये असा होता. त्यानंतर तब्बल चार वर्षांच्या अंतराने मानधनात एक हजार रुपयाची वाढ झाली आहे. हे मानधन वाढ १ एप्रिल पासून लागू होणार आहे. राज्य शासनाचे अवर सचिव प्रमोद पाटील यांनी याबाबतचे आदेश नुकतेच निर्गमित केले आहेत.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
"अनेक वर्षांपासून आमचं कुटुंबीय शाळेत तुटपुंज्या मानधनावर आहार शिजविण्याचे काम करीत आहे. मानधन दरमहा मिळत नाही."-मनीषा वाघ, पोषण आहार स्वयंपाकी
आकडे बोलतात
-राज्यातील पोषण आहार शिजविणाऱ्या महिला : १ लाख ५० हजार
-सध्या महिलांना मिळणारे दरमहा मानधन : १ हजार ५०० रुपये
-१ एप्रिल २०२३ पासून मिळणारे मानधन : २ हजार ५०० रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.