Anandacha Shidha : जिल्ह्यातील 7 लाख 98 हजार कुटुंबांना ‘आनंदाचा शिधा'

अयोध्येतील राम मंदिराची प्रतिष्ठापना ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शासन १०० रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ उपलब्ध करून देणार आहे.
Anandacha Shidha
Anandacha Shidhasakal
Updated on

Anandacha Shidha : अयोध्येतील राम मंदिराची प्रतिष्ठापना ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शासन १०० रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ उपलब्ध करून देणार आहे.

नाशिक जिल्ह्यातील ७ लाख ९८ हजार ७०५ रेशनकार्डधारक लाभार्थी कुटुंबांना त्याचा लाभ मिळणार आहे. सोमवार (ता.२२) पासून या किटचे वाटप सुरू होणार आहे. (anandacha shidha to 7 lakh 98 thousand families in district nashik news)

दिवाळीच्या धर्तीवर वितरित केल्या जाणाऱ्या आनंदाच्या शिधा किटमध्ये प्रत्येकी एक किलो साखर व पामतेल तसेच प्रत्येकी अर्धा किलो चणाडाळ, रवा, मैदा व पोह्यांचा समावेश असेल. २९ फेब्रुवारीपर्यंत वाटप पूर्ण करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार तीन ते चार दिवसांपासून तालुक्यांना एक-एक वस्तू उपलब्ध होण्यास प्रारंभ झाला आहे.

सर्व तालुक्यांमध्ये किटमधील सहाही वस्तू प्राप्त झाल्यानंतर त्याचे लाभार्थींना वितरण होईल, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी (प्रभारी) कैलास पवार यांनी दिली.

Anandacha Shidha
Anandacha Shidha : आनंदाची बातमी! 2 वेळा मिळणार ‘आनंदाचा शिधा’; अगोदर येईल त्यालाच लाभ

देवळा तालुक्यासाठी ११ हजार २५० लिटर तेल, मालेगाव ग्रामीणसाठी २० हजार किलो पोहे, नाशिक तालुक्यासाठी ६६ हजार किलो साखर, तसेच ४५ हजार ६०० किलो पोहे प्राप्त झाले आहेत. निफाडला ११ हजार २५० तर येवल्यासाठी ११ हजार ६२३ लिटर तेल प्राप्त झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

''शासनाने आनंदाचा शिधा वितरित करताना जमा होणाऱ्या रकमेतून कमिशन वजा करत बाकीची रक्कम बँकेत भरायच्या सूचना रेशन दुकानदारांना केल्या आहेत. पण शासनाने पूर्वीचेच ६ रुपये कमिशन ठेवले आहे. त्यात वाढ करून ते १० रुपये करावे.''-निवृत्ती कापसे, राज्य उपाध्यक्ष, ऑल महाराष्ट्र फेअर प्राइस शॉपकिपर्स फेडरेशन

Anandacha Shidha
Anandacha Shidha : शिधात वस्तू वाढल्या, मात्र वजनात घट! दिवाळीत लाभार्थ्यांना 100 रुपयांत आनंदाचा शिधा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.