Shivgarjana Melava: निष्ठावान शिवसैनिकच उद्दव ठाकरेंचे बळ, ते पुन्हा मुख्यमंत्री होतील : अनंत गीते

Former Union Minister Anant Geete guiding the Shivgarjana Mela at Lasalgaon.
Former Union Minister Anant Geete guiding the Shivgarjana Mela at Lasalgaon.esakal
Updated on

लासलगाव (जि. नाशिक) : सध्याचे गलिच्छ राजकारण सर्वसामान्यांना आवडलेले नाही, त्यामुळे आगामी काळ हा सच्चा शिवसैनिकांचा असून पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हे खऱ्या शिवसैनिकांच्या जोरावर विराजमान होतील असा आशावाद माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी व्यक्त केला.

(Anant Geete statement at Shivgarjana Melava Loyal Shiv Sainiks are Uddav Thackerays strength he will become Chief Minister again nashik news)

लासलगाव येथे रविवारी (ता.२७) दुपारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवगर्जना मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघ तसेच दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील निष्ठावान शिवसैनिकांची मोठी गर्दी यावेळी पाहायला मिळाली.

विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी, उपनेत्या संजना घाडी, युवा सेना सचिव वरूण सरदेसाई, जिल्हा संपर्कप्रमुख जयंत दिंडे, माजी आमदार कल्याणराव पाटील, माजी आमदार अनिल कदम, जिल्हाप्रमुख कुणाल दराडे, अद्वय हिरे, संभाजी पवार, निवृत्ती जगताप, शिवा पाटील सुराशे उपस्थित होते.

शिवसेनेत अनेक बंड झाली, या बंडांना कुठल्याही पक्षाचे पाठबळ नव्हते, मात्र सध्याची बंडखोरी हे भाजपाचे पाप असल्याचे श्री. गीते यांनी सांगितले. काही लोक सांगतात, की मराठा मुख्यमंत्री होण्यासाठी आम्ही उद्धव ठाकरे यांना सोडले, आता सहानुभूतीसाठी मराठा समाजाला पुढे करण्याचा प्रयत्न शिंदे व त्यांचे सहकारी करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

युवा सेना सचिव वरून सरदेसाई यांनी सध्या पक्ष संघर्षाच्या कसोटीवर असला तरी सर्वसामान्य व खरा शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याने आगामी काळ पक्षासाठी सुवर्णकाळ असेल असा आशावाद व्यक्त केला.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

Former Union Minister Anant Geete guiding the Shivgarjana Mela at Lasalgaon.
Nashik News : पानवेलीसंदर्भात शासनासह प्रशासनाची ढकला- ढकल! संसदेसह विधानसभेतही चर्चा; कारवाई शून्य

संजना घाडी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर कठोर शब्दात टीका केली. आमदार, खासदार विकले गेले, नाव पण विकत घेतलं, धनुष्यबाण पण घेतला, मात्र खरा शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या सोबत असल्याचे त्या म्हणाल्या.

विजय औटी यांनी सध्या राजकारणाचा जो तमाशा सुरू आहे त्यामुळे लोकशाही धोक्यात आल्याचा आरोप केला.

अद्वय हिरे यांनी शिवसेना नाव काढलं, चिन्ह काढलं पण उद्धव ठाकरे स्वतः पक्ष असल्याची भावना शिवसैनिकांमध्ये आहे. नवीन पक्षाचे नाव व मशाल चिन्ह घराघरात शिवसैनिक पोहोचतील व आपला जलवा दाखवतील असे नमूद केले.

संपर्कप्रमुख जयंत दिंडे यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सर्वच विधानसभा क्षेत्रामध्ये शिवसेना उत्सव बाळासाहेब ठाकरे यांचा झंजावात पाहायला मिळेल व जास्तीत जास्त आमदार नाशिक जिल्हा निवडून देईल असे स्पष्ट केले.

माजी सभापती शिवा पाटील सुराशे यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे, उपजिल्हा प्रमुख निवृत्ती जगताप, रतन बोरणारे, विंचूर शहर प्रमुख नाना जेऊघाले, अभिनव भंडारी, विकास रायते, संतोष पानगव्हाणे, प्रमोद पाटील, संतोष पवार, सुमंत कारवाळ, राजाभाऊ दरेकर, उत्तम वाघ, बाळासाहेब जगताप, संतोष पवार, मिलिंद निकम, ज्योती सुराशे, टाकळी विंचूर येथील महिला पदाधिकारी येवला लासलगाव विधानसभा मतदार संघातील ४६ गावातील शिवसैनिक उपस्थित होते.

Former Union Minister Anant Geete guiding the Shivgarjana Mela at Lasalgaon.
Nashik News : DCPS धारक शिक्षक वाऱ्यावर; शिक्षक दरबारात मांडल्या व्यथा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.