नाईकवाडीपुऱ्यात पुरातन वृक्ष कोसळला; 7 घरांचे नुकसान, 1 जखमी

Tree fell on houses, Damage to houses
Tree fell on houses, Damage to housesesakal
Updated on

जुने नाशिक : नाईकवाडीपुरा येथील पुरातन वृक्षाचा मोठा भाग कोसळून सात घरांचे नुकसान झाले. अडकलेल्या दहा जणांची परिसरातील तरुणांनी सुटका केली. एक जण जखमी झाला. तहसीलदार व कर्मचाऱ्यांनी घटनेचा पंचनामा केला. (ancient tree fell in Naikwadipura 7 houses damaged 1 injured Nashik Latest Marathi News)

हजरत सय्यद जुनेरी बाबा यांच्या दर्गा परिसरात वडाचे मोठे झाड आहे. त्याचा एक भाग रविवारी (ता. १४) सकाळी साडेसहाच्या सुमारास परिसरातील घरांवर कोसळला. त्यात सात घरांचे मोठे नुकसान झाले. अस्लमखान पटेल, आसिफखान पटेल, युसूफखान पटेल या तीन सख्ख्या भावांसह इम्तियाज अत्तार, सोहेल शेख, सलीम शेख, निसार सय्यद यांच्या घरांचा समावेश आहे.

अस्लमखान पटेल आणि आसिफखान पटेल या दोघांचे घरे पूर्णपणे उद्‌ध्वस्त होऊन अधिक नुकसान झाले आहे. सातही घरांमधील लाखोंचे संसारोपयोगी वस्तुंचे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. आसिफ खान मात्र जखमी झाले.

वृक्ष कोसळल्यानंतर घरात १० जण अडकले होते. परिसरातील तरुणांनी सतर्कता दाखवत कोसळलेल्या भागाच्या दुसऱ्या बाजूने सीडीच्या माध्यमातून घरांमध्ये प्रवेश करत दहा जणांची सुखरूप सुटका केली. दिवसभर वृक्ष कापण्याचे काम सुरू होते. महापालिका, अग्निशमन दल, तहसील कार्यालयाचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

Tree fell on houses, Damage to houses
Nashik : 2 शासकीय यंत्रणांमुळे शेतकरी, प्रवाशांचे हाल

अल्लाह तेरा करम

पहाटेची वेळ असल्याने घरात सर्वजण झोपले होते. दोन महिला नमाज पठण करीत होत्या. त्याचवेळी वृक्षाचा भाग घरांवर कोसळला. नमाज पठण होत असल्याने आम्हा सर्वांवर अल्लाचा करम झाला. त्यांच्यामुळे आम्हा सर्वांचे प्राण वाचले.

नाहीतर इतक्या मोठ्या दुर्घटनेत कुणाचेही वाचणे शक्य नव्हते. इतकेच नाही, तर परिसरातील तरुणही अल्लाचे जणू दूत बनून आले आणि त्यांनी आम्हा सर्वांना सुखरूप बाहेर काढले. अशा प्रतिक्रिया दुर्घटनेतून बचावलेले कुटुंब व परिसरातील नागरिकांनी दिल्या.

वृक्षाच्या छाटणीची मागणी

कोसळलेला वृक्ष अतिशय प्राचीन आहे. त्याचा विस्तार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. यापूर्वीही अशाप्रकारची घटना घडली आहे. वृक्षाच्या छाटणीची मागणी महापालिकेकडे यापूर्वी केली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

प्राचीन वृक्ष असल्याने ते पूर्णपणे कापण्याची आवश्यकता नाही. त्याचा वाढलेला विस्ताराची छाटणी करणे आवश्यक आहे. जेणेकरून अशा दुर्घटना घडणार नाहीत, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Tree fell on houses, Damage to houses
शिक्षक भरती आता MPSCच्या धर्तीवर; पुढील भरती नव्या पद्धतीनुसारच होणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.