Nashik News | खंड, सीमारेषा, प्रांत विसरून जलसंवर्धनाचे काम आवश्‍यक : रुतेंद्रो नगारा

भारतातील प्रयत्‍नांनी स्‍वयंसेवकांना मिळणार ऊर्जा
Rutendro Nagara
Rutendro Nagaraesakal
Updated on

नाशिक : एकेकाळी जलस्‍त्रोताबाबत संपन्न दक्षिण आफ्रिका खंडातील काँगो क्षेत्रात पाण्याचा संघर्ष सुरू झाला आहे. तसेच जगात अन्‍य भागांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली आहे. देशातंर्गत नदीवर धरण बांधल्‍याने राज्‍यांमध्ये वाद निर्माण होत आहेत. तसेच अन्‍य देशांत प्रवाहित नदीच्‍या पाण्याची अडवणूक आंतरराष्ट्रीय स्‍तरावर वादाचे कारण ठरत आहे.

त्यामुळे जलसंवर्धन मुद्दा संवेदनशील असून, त्‍यावर उपाययोजना करताना खंड, सीमारेषा, प्रांत विसरून काम करण्याची आवश्‍यकता आहे, अशी भावना दक्षिण आफ्रिकामधील ॲनसिएन्ट व्हिस्डम फाउंडेशनच्या रुतेंद्रो नगारा यांनी व्यक्त केली. ‘सकाळ’शी त्या बोलत होत्या. (ancient wisdom foundation Rutendro Nagara statement Water conservation work necessary without forgetting continents borders regions Nashik News)

भारतात नियोजित ‘जी-२० समीट’च्‍या निमित्त ‘सी-२०’ संलग्‍न उपक्रमासाठी आलेल्‍या नगारा यांनी जलसंवर्धनातील आव्‍हानांवर भाष्य केले. त्या म्हणाल्या, की दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक लांब, सर्वाधिक खोल नद्या व त्‍यांच्‍याभोवती उद्‍भवत असलेली आव्‍हाने संपूर्ण जगासाठी शिकवण घेण्यासारखे आहे. पाण्याच्‍या मुद्यावर तिसरे विश्‍वयुद्ध होईल, अशी चेतावणी अनेकवेळा दिली जाते.

सध्या थेट युद्धजन्‍य स्‍थिती दिसत नसली, तरी देशांमध्ये, देशातंर्गत संघर्षाची ठिणगी पेटली आहे. परंतु कुठलीही एक संस्‍था, प्रांत, एक देश अथवा एक खंड पाण्याच्‍या प्रश्‍नावर तोडगा काढू शकत नाही. त्‍यासाठी सामूहिक प्रयत्‍न केल्‍याशिवाय पर्याय नाही. प्रवाहित असणे हा नदीचा मूलभाव असून, प्रवाह खंडित झाल्‍यास ती नदी नव्हे, तर तळे होऊन मर्यादित स्वरूप येईल.

‘अंबुटू’चा भाव मनोमनी निर्माण व्‍हावा

‘मी आहे कारण तुम्‍ही आहात.. मी आहे, कारण हे झाड आहे, ही नदी आहे.’ या भावनेला आफ्रिकेत ‘अंबूटू’ असे संबोधतात. हा भाव प्रत्‍येकाच्‍या मनोमनी निर्माण झाल्‍यास निसर्गाचे संवर्धन सुलभ होईल, असा विश्‍वास व्‍यक्‍त करून नगारा यांनी ‘जी-२० समीट’ निमित्ताने या संवेदनशील मुद्यावर चर्चा घडत असल्‍याबद्दल समाधान व्‍यक्‍त केले.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

Rutendro Nagara
Nashik Kala Katta | प्रतिभेतून प्रतिमा साकारणारे युवा शिल्पकार : श्रेयस गर्गे

भारतात जलसंवर्धनाचे कार्य प्रभावी

मॅगसेसे पुरस्‍कार विजेते डॉ. राजेंद्र सिंह यांच्‍यासोबत इजिप्तमध्ये पहिल्‍यांदा भेट झाली. त्‍यांच्‍या आमंत्रणानंतर भारत दौऱ्यावर आले आहे. डॉ. सिंह आणि त्‍यांच्‍याशी निडित घटकांकडून भारतात सुरू असलेले जलसंवर्धनाचे कार्य अत्‍यंत प्रभावी असल्‍याचे नगारा यांनी सांगितले.

ते म्हणाले, की डॉ. सिंह यांच्या मोहिमेशी जोडले जाताना साखळी निर्माण करण्याचा प्रयत्‍न आहे. गंगेप्रमाणे गोदावरी नदीला महत्त्व आहे. ‘ब्रह्मगिरी की हरियाली और गोदावरी की पवित्रता’ हा उपक्रम नमामि गोदा फाउंडेशन आणि द सत्‍संग फाउंडेशन यांच्‍यातर्फे राबविला जात असून, त्‍यास ‘सकाळ’ माध्यम समूहासारखे व्‍यापक व्‍यासपीठ जोडले गेल्‍याने ही मोहीम नक्‍की यशस्‍वी होईल.

निसर्गाचा थेट आध्यात्‍माशी संबंध

आफ्रिका खंडातील आमच्‍या प्रांतात निसर्गातील प्रत्‍येक घटकाला देवाइतके महत्त्वा‍चे स्‍थान दिले जाते. सांस्‍कृतिक सोहळे झाडांभोवती केले जातात. झाडाला रिंगण घालताना आम्‍ही सोहळे राबवतो. त्यामुळे निसर्गाचे पूजन होते.

सोबत वर्तुळामुळे सर्व एकमेकांमध्ये समाविष्ट होत कुठलाही भेद राहात नाही. अगदी युरोपसारख्या प्रगत प्रांतात निसर्गाला धार्मिक महत्त्‍व लाभले आहे. त्‍यामुळे निसर्गाचा थेट आध्यात्‍माशी संबंध असून, संस्‍कृती टिकविण्यासाठी निसर्ग टिकविला पाहिजे, अशी अपेक्षा नगारा यांनी व्‍यक्‍त केली.

Rutendro Nagara
NDCC Bank Kharif Loan : जिल्हा बॅंकेकडून 'या' तारखेपासून खरीप पीक कर्ज वाटप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.