Nashik News: CAसाठी आता 3 विषयांचा ग्रुप : अनिकेत तलाटी

आर्टिकलशिप सलग दोन वर्षांची
Chartered Accountant
Chartered Accountantesakal
Updated on

Nashik News : सनदी लेखापाल (सीए) अभ्यासक्रमात मे २०२४ च्‍या परीक्षेपासून आमूलाग्र बदल होणार आहेत.

इंटरमिजिएट आणि फायनल या परीक्षांमध्ये यापूर्वी ग्रुपमध्ये चार विषयांचा समावेश असायचा. सुधारित अभ्यासक्रमात प्रत्‍येकी तीन विषयांचे दोन ग्रुप या परीक्षांमध्ये असतील.

याशिवाय आर्टिकलशिप तीनऐवजी दोन वर्षे, पण अखंडितपणे पूर्ण करावी लागणार आहे, अशी माहिती दी इन्‍स्‍टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) चे राष्ट्रीय अध्यक्ष सीए अनिकेत सुनील तलाटी यांनी रविवारी (ता.८) दिली. (Aniket Talati statement Group of 3 subjects now for CA Nashik News)

राष्ट्रीय स्‍तरावरील परिषदनिमित्त नाशिकला आलेल्‍या श्री.तलाटी यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना संघटनेच्‍या बदलांची माहिती दिली.

श्री. तलाटी म्‍हणाले, की फाउंडेशन उत्तीर्ण विद्यार्थ्यांना इंटरमिजिएटला प्रत्‍येकी चार विषयांचे दोन असे आठ विषय असायचे. फायनल परीक्षेलाही अशीच रचना होती. परंतु नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमात बदल केले आहेत.

त्‍यानुसार इंटरमिजिएट आणि फायनल्‍समध्ये प्रत्‍येकी तीन विषयांचे दोन ग्रुप असतील. तर इंटरमिजिएट झाल्‍यानंतर सेल्‍फ बेस्‍ड मॉड्युलवर आधारित चार विषय विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होणे बंधनकारक असेल.

वेगवेगळ्या १० विषयातून विद्यार्थ्यांना या चार विषयांच्‍या निवडीची मुभा असेल. आणखी एक महत्त्वाची बाब म्‍हणजे, पूर्वी तीन वर्षांची आर्टिकलशिप असायची. व विद्यार्थ्यांना मध्ये सहा महिने विश्रांती घेता यायची.

Chartered Accountant
October Heat: ऑक्‍टोबर हीटचा नाशिककरांना तडाखा! भरपूर पाणी पिण्याबरोबर उन्हात जाणे टाळण्याचा सल्ला

परंतु आता सलग दोन वर्षे आर्टिकलशिप करावी लागणार असून, वर्षातून केवळ १२ दिवस सुट्या विद्यार्थ्यांना घेता येतील. आंतरराष्ट्रीय स्‍तरावर जाऊनदेखील आर्टिकलशिप करण्याची संधी उपलब्‍ध असेल.

जागतिक स्‍तरावर भारताची अर्थव्‍यवस्‍था झपाट्याने वाढत असून, यामध्ये सनदी लेखापालांचे योगदान महत्त्वाचे आहे. वित्तीय व करविषयक जनजागृतीच्‍या उद्देशाने देशभरात बारा भाषांमध्ये माहिती देण्याचा उपक्रम राबविला जातो आहे.

२५ टक्‍के सीए महाराष्ट्रात

आवश्‍यकतेइतके तज्‍ज्ञ सीए भारतामध्ये उपलब्‍ध आहेत. सद्यःस्‍थितीत चार लाख सीए भारतात कार्यरत असून, यापैकी एक लाख अर्थात २५ टक्‍के सीए एकट्या महाराष्ट्रात आहेत.

मुंबईत कंपन्‍यांचा मोठा विस्‍तार असल्‍याने यामुळे सनदी लेखापालांच्‍या संख्येत महाराष्ट्र अव्वल स्‍थानी असल्‍याचे श्री. तलाटी यांनी नमूद केले.

Chartered Accountant
Nashik: हंगामाच्या पहिल्या गणनेत 8 हजार पक्ष्यांची नोंद; पक्षीतीर्थमध्ये हिवाळी ‘पाहुण्यां'चा वाढला किलबिलाट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.