Anil Kadam Sharad Pawar : अनिल कदम शरद पवारांच्या भेटीला; आमदार बनकरांच्या अडचणी वाढणार?

Anil Kadam meets Sharad Pawar nashik news
Anil Kadam meets Sharad Pawar nashik news
Updated on

Anil Kadam Sharad Pawar : राज्यातील अस्थिर राजकीय घडामोडीचे कंप संवेदनशील निफाड मतदारसंघात जाणवत आहे. शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादीत उभी दुफळी झाल्यानंतर निफाडचे राजकारण ज्यांच्या भोवती पिंगा घालत आहे त्या आमदार दिलीप बनकर व माजी आमदार अनिल कदम यांच्या भूमिका मतदारसंघाच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरल्या.

त्यात शिवसेनेचे कदम हे उद्धव ठाकरे यांच्याशी निष्ठावान राहिले तर आमदार बनकर विकासाच्या मुद्द्यावर अजित पवार यांच्या गोटात दाखल झाले. वर्षभरावर आलेली विधानसभा निवडणुकीतील लढत बनकर-कदम यांच्यात होणार या शिक्कामोर्तब झाले असतानाच त्यादृष्टीने अनिल कदम यांनी आपले पाऊले टाकण्यास सुरवात केली आहे. (Anil Kadam meets Sharad Pawar nashik news)

याच पाश्‌र्वभूमीवर माजी आमदार कदम यांनी आमदार बनकर यांचे टेन्शन वाढवत दिल्ली जाऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत साधला. या ग्रेट-भेटीचे तरंग निफाडच्या राजकारणावर उटत आहे. शरद पवार यांच्या अस्सिम निष्ठावंत आजही निफाड तालुक्यात आहे.

गत विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांची सातारामधील पावसातील आणि पिंपळगावच्या सभा निफाडच्या निवडणुकीला कटालणी देऊन गेल्याचे राजकीय विश्‍लेषक सांगतात. तालुक्यात शरद पवार यांना मानणारा वर्ग मोठा आहे. राष्ट्रवादीतील भूकंपानंतर आमदार दिलीप बनकर यांनी अजित पवार यांची सोबत जाण्याचा निर्णय काही ज्येष्ठा बरोबरच तालुक्यातील युवा पिढीला रूचलेला नाही.

याउलट माजी आमदार अनिल कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी निष्ठा कायम राखली. महाविकास आघाडीच्या सरकारमुळे काहीसे राजकीय अवघडलेपण आलेले श्री. कदम यांना राष्ट्रवादीतील फुट व आमदार बनकर यांची अजित पवार गटाला साथ आशेचा किरण ठरते आहे. गत विधानसभा निवडणुकीतील अनपेक्षीत अन तितकाच धक्कादायक, मंत्रीपदाच्या स्वप्नांचा चुराडा करणारा पराभव अनिल कदम यांच्या वाट्याला आला.

Anil Kadam meets Sharad Pawar nashik news
Sharad Pawar Gautam Adani: शरद पवार अदानींच्या गुजरातमधील घरी दाखल, चर्चांना पुन्हा उधाण!

तर दहा वर्षे राजकीय चटके सोसून फिनिक्स पक्षाप्रमाणे दिलीप बनकर यांनी विजय साकारत आमदार पदाला गवसणी घातली. चटका लावणाऱ्या पराभवानंतर गत चार वर्षे राजकीय पटलावर कदम यांचा वावर काही कमी झाला होता. पण चार महिन्यापूर्वी झालेल्या पिंपळगाव बाजार समितीच्या निवडणुकीत स्वत:सह सहा संचालक निवडून आणत आमदार बनकर यांना जोरदार टक्कर दिली.

बाजार समितीत शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्याय विरोधात ते आवाज उठवीत आहे. वीजप्रश्‍न, चेन्नई महामार्गातील संभाव्य भुसंपादनाच्या मोबदल्याचा मुद्दा आदीवरून त्यांनी धडक मोर्चे काढत लढत अजून संपली नसल्याचे संकेत दिले.

पवार, कदम यांच्यात दिलखुलास चर्चा

अनिल कदम यांनी निफाडचे रणांगण पुन्हा गाजविण्यास सुरवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कट्टर प्रतिस्पर्धी आमदार बनकर यांचे टेन्शन वाढविण्या बरोबरच आगामी डावपेच आखण्यासाठी दिल्ली गाठत शरद पवार यांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या समस्या बरोबर निफाडच्या राजकीय स्थितीचे बारकावे पवार यांनी कदम यांच्याकडून जाणून घेतल्याचे समजते.

Anil Kadam meets Sharad Pawar nashik news
Sharad Pawar : 'त्या' फोटोनंतर शरद पवारांची प्रफुल्ल पटेलांबद्दल गुजरातमध्ये नाराजी; म्हणाले...

राष्ट्रवादीच्या फुटी दरम्यान शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आमदार बनकर यांच्या भाजप सोबत जाण्याच्या पत्रावरून निशाणा साधला होता. यात सत्यता किती हे अद्याप बाहेर आलेले नाही. पण निफाडची जागा महाविकास आघाडीकडे राखण्यासाठी शरद पवार हे चाणक्यनिती वापरू शकतात.

शरद पवार यांचा निफाड मतदारसंघातील समर्थक बघता आगामी काळात मतदारसंघात अनिल कदम हे पवारांची सभा घेण्याची व्यूहरचना आखण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

"दिल्ली येथे शरद पवार यांची भेट घेत शेतकरी अवस्था व निफाड मतदार संघातील राजकीय स्थितीबाबत चर्चा झाली. त्यांच्याशी झालेला संवाद हुरूप वाढविणार आहे. मी शिवसेना अर्थात उद्धव ठाकरे यांच्याशी प्रामाणिक आहे. भेटीतून पक्षातंरा सारखा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही." - अनिल कदम (माजी आमदार).

Anil Kadam meets Sharad Pawar nashik news
Anil Parab : Ramdas Kadam यांना मोठा धक्का; भावावर ईडीची मोठी कारवाई, परबांची अडचण वाढणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.