Swami Samarth Seva Kendra: श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राची सखोल चौकशी करा; अंनिसची जिल्हा प्रशासनाकडे मागणी

Swami Samarth Gurupeeth
Swami Samarth Gurupeethesakal
Updated on

Swami Samarth Seva Kendra : दिंडोरी येथील अखिल भारतीय स्वामी समर्थ केंद्र (दिंडोरीप्रणीत) आणि त्यांच्या आध्यात्मिक केंद्रांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र अंनिसच्या वतीने करण्यात आली आहे.

त्यासंदर्भातील निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. (Anis demands to conduct thorough investigation of Shri Swami Samarth Seva Kendra dindori nashik news)

निवेदनात म्हटले आहे, की अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठ विश्वस्त मंडळाच्या कार्यकारी सदस्याला आक्षेपार्ह चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी देत, वीस कोटींच्या खंडणीची मागणी करत आजवर तब्बल एक कोटी पाच लाख उकळणाऱ्या संशयित महिलेला व तिच्या मुलाला प्रत्यक्ष दहा लाखांची खंडणी स्वीकारताना नाशिक शहर पोलिसांनी अटक केल्याची बातमी वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झालेली आहे.

विशेष म्हणजे, तक्रारदार हे स्वामी समर्थ गुरुपीठ विश्वस्त मंडळाचे कार्यरत सदस्य आहेत.

Swami Samarth Gurupeeth
Nashik ZP News: टंचाई कृती आराखड्याबाबत जिल्हा परिषद उदासीन; नोव्हेंबर उजाडूनही होईना जिल्हा टंचाई कृतिआराखडा

अटक करण्यात आलेल्या संशयित महिला या कृषी विभागात अधिकारी असून, खंडणी देणारे आणि मागणारे संशयित हे सर्व सदर स्वामी समर्थ केंद्राचे विश्वस्त सदस्य शाखांचे, केंद्राचे व्यवस्थापक आहेत.

ते कुणी सामान्य भक्त, सेवेकरी नाहीत, ही बाब आपण प्रामुख्याने लक्षात घ्यावी. निवेदनावर अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे, राज्य सदस्य राजेंद्र फेगडे, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. श्यामसुंदर झळके, बुवाबाजीविरोधी संघर्ष जिल्हा सचिव महेंद्र दातरंगे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Swami Samarth Gurupeeth
MPSC Typing Skill Test: टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी ‘एमपीएससी’ची नवी कार्यपद्धती जाहीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.