Nashik News : परवाना न घेता कारखाना चालविणे फौजदारी स्वरूपाचा गुन्हा : अंजली आडे

Anjali Ade
Anjali Ade esakal
Updated on

Nashik News : ज्या जागेत २० किंवा त्याहून अधिक कामगार काम करीत असतील आणि विजेचा वापर करून उत्पादन केले जाते, अशा सर्व आस्थापनांनी औद्योगिक सुरक्षा विभागाची परवानगी न घेतल्यास त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा औद्योगिक सुरक्षा विभागाचे सहसंचालक अंजली आडे यांनी दिला आहे.

याबाबत औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, नाशिक विभाग कार्यालयामार्फत सूचित करण्यात आले आहे.(Anjali Ade Joint Director Statement Industrial Safety Department Running Factory without license is a criminal offence Nashik News)

अंजली आडे म्हणाल्या, की ४० किंवा त्याहून अधिक कामगार काम करीत असतील आणि विजेचा वापर न करता उत्पादन केले जाते, अशा सर्व आस्थापनांना / कारखान्यांना, तसेच दाब सयंत्राचा, बॉयलर आणि धोकादायक रसायनांचा वापर करून उत्पादन प्रक्रिया करणाऱ्या सर्व आस्थापनांना / कारखान्यांना, २० पेक्षाकमी कामगार संख्या असली तरीही अशा सर्व कारखान्यांना कारखाने अधिनियम, १९४८ अंतर्गत परवाना घेणे बंधनकारक आहे.

परवाना न घेता कारखाना चालविणे हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा असून त्या करिता भोगवटादार कायदेशीर कारवाईस पात्र ठरतील. याकरिता ज्या आस्थापनांना / कारखान्यांना, कारखाने अधिनियम, १९४८ च्या तरतुदी लागू होतात व ज्या कारखान्यांनी अद्यापपर्यंत परवाना नोंदणीसाठी अर्ज केलेला नाही, अशा सर्व कारखानदारांनी परवाना नोंदणी / नकाशे मंजुरीसाठी www.maitri.mahaonline.gov.in / https:aaaplesarkar. mahaonline. gove.in / www.lms.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर जाऊन विनाविलंब अर्ज सादर करण्याचे आवाहन औद्योगिक सुरक्षा व आरोग्य नाशिक विभागामार्फत करण्यात आले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Anjali Ade
Nashik News : बोहाड्यातून घडले लोकसंस्कृतीचे दर्शन; नरसिंह- हिरण्यकश्यपू वधाने उत्सवाची सांगता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.