घोटभर पाण्यासाठी घोटीकरांची वणवण; नियमित पाण्यासाठी आणखी 6 महिने थांबा

water crisis
water crisisesakal
Updated on

नाशिक : घोटी परिसरात मुबलक पाणी असताना देखील घोटीवासियांना शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी धडपड करावी लागते. मात्र अजूनही नियमित पाणी मिळण्यासाठी घोटीकरांना पुढील सहा महिने ते वर्षभराची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

जलजीवन मिशन अंतर्गत नवीन पाणी पुरवठा योजने मंजूर झाली असून लवकरच या योजनेचे काम सुरू होणार आहे. किमान ते तरी वेळेत व्हावे अशा प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत. (another 6 months Wait for regular water ghoti citizens Nashik Latest marathi news)

इगतपुरी तालुक्यातील सर्वांत मोठी बाजारपेठ असलेले घोटी शहर हे नैसर्गिक, आर्थिक आणि पाण्याने समृद्ध आहे. शहरालगत भावली, वाकी, भाम अशी धरणे आहे. तालुक्यात सुरू असलेल्या सततच्या पावासामुळे ही धरणे देखील भरली आहे.

घोटी शहरात अनेक भाताच्या मिल देखील आहे. मात्र असे असताना देखील घोटीकरांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते, पाण्याचा साठा करून ठेवावा लागतो. घोटी शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता शहरवासीयांना नियमित पाणी पुरवठा व्हावा यासाठी नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होणे ही गरज होती. परंतु असे असताना देखील जुन्याच पाणीपुरवठा योजनेतून शहरवासीयांची तहान भागविली जाते.

जलजीवनचा मिळाला आधार

केंद्राच्या जलजीवन मिशन अंर्तगत घोटीसाठी सुमारे २० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्‍यक ती सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच ह्या कामास सुरुवात केली जाईल.

water crisis
Nashik : द्वारका ते मुंबई नाका मार्गावर वाहने घसरून अपघात

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणतंर्गत हे काम होणार आहे. या योजनेंतर्गत थेट भावली धरणातून पाणी हे घोटीकरांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. ही योजना पूर्ण झाल्यानंतर घोटीकरांची पिण्याच्या पाण्याची अडचण ही सुटणार आहे. या योजनेमुळे नागरिकांना प्रतिमाणसी प्रतिदिन ५५ लीटर पाणी उपलब्ध होणार आहे.

"सततच्या पावसामुळे आणि तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने घोटी शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. गढूळ पाणी स्वच्छ करताना वेळ लागत आहे. मात्र या समस्या सोडविल्या जात आहे. घोटीचा विस्तार झपाट्याने होत आहे. यातच पाण्याची वाढती गरज लक्षात घेता नवीन पाणीपुरवठा योजना देखील मंजूर झाली आहे."

-गणेश गोडे, सरपंच, घोटी ग्रामपालिका

"पावसाळ्यात निर्माण झालेल्या काही समस्यांमुळे अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पाणी सोडण्याची वेळही कमी करण्यात आली. आता जलजीवन मिशन अंतर्गत शहराला नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. पुढील ३० वर्षाचे नियोजन गृहीत धरून ही पाणीपुरवठा योजना अंमलात येणार आहे. यामुळे घोटीकरांना दररोज पाणी पुरवठा करणे शक्य होईल."

-रवींद्र धुंदाळे, ग्रामविकास अधिकारी, घोटी.

water crisis
Nashik : औरंगाबाद नाका ते तपोवन चौफुली रस्त्यावर वाहतूक कोंडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()