Nashik Naresh Karda : कारडा कन्स्ट्रक्शनचे नरेश कारडा फसवणुकीप्रकरणी पोलीस कोठडीत असतानाच त्यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे. कारडा यांच्याविरोधात जेलरोड परिसरातील एका प्लॉटच्या व्यवहारापोटी ४ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा उपनगर पोलिसात दाखल झाला आहे.
सदरचा गुन्हा तपासासाठी शहर आर्थिक गुन्हेशाखेकडे वर्ग केला आहे. (Another case of fraud of 4 crores against builder Naresh Karda due to plot transaction nashik fraud crime news)
सुनील देवकर (रा. बळीराम पेठ, जळगाव) यांनी उपनगर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, त्यांचे आजोबा गजानन देवकर (९०) यांचा आणि नरेश कारडा यांच्यात २००७ पासून व्यावसायिक संबंथ आहेत. त्यातून त्यांनी २०१७ मध्यये कारडा यांच्या मालकीचा जेलरोडच्या पंचक शिवारातील प्लॉटचा दोघांमध्ये व्यवहार झाला होता.
त्या व्यवहारापोटी देवकर यांच्या आजोबांनी चार कोटी रुपये दिले होते. तर कारडा यांनी त्या मिळकतीचे खरेदीखत करण्यासाठी वेळ मागून घेतली होती. दरम्यान, कारडा यांनी २०१९ मध्ये सदरील प्लॉटची परस्पर विक्री करीत देवकर यांच्या आजोबांची फसवणूक केली. त्यानंतरही कारडा यांनी देवकर यांना दुसरी मिळकत न देता त्यांच्या चार कोटी रुपयांची फसवणूक केली. वेळोवेळी पैशांची मागणी करूनही कारडा यांनी वेळ मारून नेली.
अखेर सुनील देवकर यांनी उपनगर पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार, नरेश कारडा यांच्याविरोधात फसवणुकीचा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.
सदरील गुन्हा शहर आर्थिक गुन्हेशाखेकडे वर्ग करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड हे तपास करीत आहेत.
तक्रारींसाठी आवाहन
कारडा कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून ग्राहकांची फसवणूक झाली असल्यास त्यांनी गंगापूर रोडवरील पोलीस आयुक्तालयातील शहर आर्थिक गुन्हेशाखेकडे तक्रार द्यावी, असे आवाहन पोलीस आयुक्तालयातर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, बहुतांशी ग्राहकांनी फ्लॅट वा गाळ्यासाठी कारडा कन्स्ट्रक्शनकडे खरेदीसाठी गुंतवणूक केली असून, त्यातील बहुतांशी रक्कम ही रोख स्वरुपात घेतली आहे.
यातील काही ग्राहक हे नोकरी व लहान व्यावसायिक आहेत. मोठी रक्कम गुंतवणूक केल्याने तेही कर्जाच्या खाईत लोटले गेले आहेत. कारडा यांच्या अटकेमुळे गुंतवणूक केलेल्यांना त्यांच्या रकमा मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.