मालेगाव (जि. नाशिक) : शहर व तालुक्यातील विविध भागात शेतजमीन, भूखंड विक्री करून मालकांशी सौदा करत इसार रक्कम देऊन उर्वरित रक्कम न देता फसवणूक व ठकबाजी करणाऱ्या जमीन खरेदी-विक्री प्रकरणातील दलाल वासुदेव प्रकाश शिर्के (वय ३८, रा. मुक्ताई कॉलनी, भायगाव शिवार) याच्यासह सतरा जणांविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.
यात मुंगसे येथील भूखंड मालकाची सुमारे सव्वादोन कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. (Another crime against 17 persons including Dalal Vasudev Shirke Nashik Crime News)
मुंगसे (ता. मालेगाव) येथील तात्याभाऊ परशराम देवरे (वय ६०) यांची दरेगाव शिवारातील मिळकत क्रमांक १७१/१/अ या ४३.२० आर. क्षेत्र असलेल्या जमिनीचा दोन कोटी ८९ लाख ६९ हजार रुपयांना वासुदेव शिर्के व सहकाऱ्यांनी सौदा केला. यात काही संशयित मध्यस्थ आहेत.
प्रत्यक्षात सौदा करून ५२ लाख रुपये देऊन उर्वरित २ कोटी ३७ लाख ३९ हजार रुपये न देता फसवणूक करण्यात आल्याचे श्री. देवरे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी देवरे यांनी २१ जानेवारीला जिल्हा पोलिस प्रमुखांसह संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दिला होता. या अर्जाच्या चौकशीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक कंचन भोजणे तपास करीत आहेत.
हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?
वासुदेव शिर्के, कुंदन बोरसे, सोमनाथ हिरे, जितेंद्र कास या चौघांविरुद्ध यापूर्वीही अर्चना अहिरे (रा. साई चौक, बालेवाडी, पुणे) यांच्या तक्रारीवरून ५८ लाख ६२ हजार रुपयांचा फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
संशयितांनी भूखंड खरेदी करून ९ लाख ३८ हजार रुपये अदा केले. उर्वरित ५८ लाख ६२ हजाराचा धनादेश दिलाच नाही. न्यायालयीन आदेशावरून फसवणुकीचा हा गुन्हा दाखल झाला. यात न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिर्केला या प्रकरणी अटक झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.