Nashik Bribe Crime : लाचखोर प्रांत डॉ. निलेश अपार मेमध्येच अडकले असते, पण...

anti corruption department trap was known to dr nilesh apar nashik bribe crime news
anti corruption department trap was known to dr nilesh apar nashik bribe crime newsesakal
Updated on

Nashik Bribe Crime : उद्योजकांची बंद केलेली कंपनी पुन्हा सुरू करण्यासाठी ४० लाखांची लाच स्वीकारण्याच्या तयारीत असतानाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचया सापळ्याची कुणकुण लागली, अन्यथा दिंडोरीचे प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार गेल्या २८ मेस गजाआड गेले असते. (anti corruption department trap was known to dr nilesh apar nashik bribe crime news)

नंतर मात्र डॉ. अपार यांनी लाचेची रक्कम घेण्यास चालढकल सुरू केली. अखेर बुधवारी (ता. २८) दिंडोरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. यामुळे जिल्ह्यातीलच नव्हे, तर राज्यभरातील महसुल विभागात खळबळ उडाली आहे.

मुंबईतील एका उद्योजकाची दिंडोरीत कंपनी आहे. या कंपनीने जमीन अकृषक (एनए) न करताच बांधकाम केल्याचा ठपका ठेवत लाचखोर प्रांताधिकारी डॉ. अपार यांनी कंपनी बंद ठेवण्याचे तोंडी आदेश दिले होते.

यासंदर्भात तक्रारदार कंपनी मालकाने गेल्या २२ मेस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार डॉ. अपार यांनी लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दाखविल्याने लाचलुचपतच्या पथकाने पडताळणी करून २८ मेस सापळा रचला. त्यावेळी लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी डॉ. अपार कार्यालयाच्या बाहेर थांबूनही होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

anti corruption department trap was known to dr nilesh apar nashik bribe crime news
Nashik Child Labor Bribe Case: लाचखोर निशा आढाव यांना एका दिवसाची कोठडी

परंतु, ऐनवेळी त्यांच्या कार्यालयातील एकाने संशयास्पद हालचालीवरून डॉ. अपार यांना सावध केले अन्‌ सापळा फसला, अशी माहिती आता समोर आली आहे. अन्यथा त्याच दिवशी डॉ. अपार ४० लाखांच्या लाचप्रकरणी गजाआड झाले असते.

८ जूनला पुन्हा प्रयत्न

२८ मेस सापळा फसल्यानंतर ‘लाचलुचपत’ विभागाचे पथक पुन्हा सज्ज होते. परंतु, काहीसे सावध झालेले प्रांत डॉ. अपार यांनी चालढकल सुरू केली. लाचेची रक्कम स्वीकारण्यास नकारही नाही आणि होकारही नाही अशा स्थितीत डॉ. अपार होते. यातून लाचलुचपतच्या पथकाने पुन्हा गेल्या ८ जूनला सापळा रचून प्रयत्न केला.

परंतु, सावध झालेले डॉ. अपार कार्यालयात थांबलेच नाही. त्यामुळे दुसऱ्यांदा सापळा अपयशी ठरला.

anti corruption department trap was known to dr nilesh apar nashik bribe crime news
Nandurbar Bribe Crime : नवापूरला गुजराती शाळेचा लिपिक लाचेच्या जाळ्यात

मात्र, तक्रारीवेळीच तांत्रिक पुरावे लाचलुचपतच्या पथकाकडे असल्याने त्याआधारे पथकाने अखेर बुधवारी दिंडोरी पोलिस ठाण्यात डॉ. अपार यांच्याविरोधात लाचेची मागणी केल्याचा गुन्हा दाखल केला.

घराची झडती अन्‌ दिवसभर चौकशी

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर गुरुवारी (ता. २९) पहाटेपर्यंत डॉ. अपार यांच्या दिंडोरीतील शासकीय निवासस्थान व नाशिकमधील खासगी निवासस्थानात झडतीसत्र राबविण्यात आले. यात अद्यापपर्यंत काहीही हाती लागले नाही.

तसेच, गुरुवारी दिवसभर त्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात चौकशी सुरू होती. दोन महिन्यांपूर्वीच डॉ. अपार दिंडोरीच्या प्रांताधिकारीपदी रुजू झाले होते. मूळ जळगावचे असलेले डॉ. अपार यांनी बीएचएमएस हे वैद्यकीय शिक्षण घेतले आहे.

anti corruption department trap was known to dr nilesh apar nashik bribe crime news
Nashik Bribe Crime: दिंडोरीच्या प्रांतने केली तब्बल 40 लाखांच्या लाचेची मागणी; ACBची कारवाई, गुन्हा दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.