दुचाकी चोरी नियंत्रणासाठी पोलिसांचं ‘Anti Motorcycle Theft’ पथक

Bikes stored in the police station.
Bikes stored in the police station.esakal
Updated on

जुने नाशिक : शहरात दुचाकी चोरीचे (Bike Theft) प्रमाण प्रचंड वाढले आहे. प्रत्येक पोलिस ठाण्यात दैनंदिन एक किंवा दोन चोरीचे गुन्हे दाखल होत आहेत. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिस आयुक्तालयाकडून (Police Commissionerate) ‘ॲन्टी मोटारसायकल थेप्ट’ (Anti Motorcycle Theft) विशेष दोन पथक नियुक्त केले आहे.

प्रत्येक पोलिस ठाण्यातून एक किंवा दोन कर्मचाऱ्यांची पथकात नियुक्ती करण्यात आली आहे. पथकाने पारदर्शी कामकाज करण्याच्या सूचना वरिष्ठांकडून देण्यात आल्या आहेत. (Anti Motorcycle Theft Squad for Two Wheeler Theft Control Nashik Latest Marathi news)

दुचाकी चोरीच्या घटना शहरात प्रचंड वाढल्या आहेत. नजर चुकत नाही, तोच दुचाकी चोरी होण्याच्या घटना घडत आहेत. शहरवासीयांकडून दुचाकी चोरीस आळा बसण्यासाठी पोलिस प्रशासनाने ठोस पावले उचलावी, अशी मागणी सतत केली जात आहे.

चोरीचे प्रमाण आणि नागरिकांची मागणी लक्षात घेता पोलिस आयुक्तालयाकडून परिमंडळ एक पोलिस उपायुक्त आणि परिमंडळ दोन पोलिस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनात ‘ॲन्टी मोटारसायकल थेप्ट’ नावाचे दोन विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे.

परिमंडळ एक आणि दोन अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक पोलिस ठाण्यातून एक किंवा दोन पोलिस कर्मचारी, अधिकारी अशा प्रत्येकी ११ जणांचा एका पथकात समावेश करण्यात आला आहे. दोन्ही पथकाच्या परिमंडळांतर्गत येणाऱ्या विविध भागात दुचाकी चोरी संदर्भातील गुन्हे प्रतिबंधक कारवाई करणार आहे.

यामुळे दुचाकी चोरावर नियंत्रण मिळविणे शक्य होणार असल्याचे पोलिस प्रशासनाकडून बोलले जात आहे. मंगळवार (ता. १२) पासून दोन्ही पथक कार्यरत करण्यात आले आहेत. ३१ ऑगस्टपर्यंत पथक कार्यान्वित असणार आहे. पथकांना मिळणारा प्रतिसाद उघडकीस आलेले गुन्हे लक्षात घेता पुढेही पथकाचा कार्यकाल वाढविण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Bikes stored in the police station.
Nashik Flood News : पुरातील मृतांची संख्या 10; 3 मृतदेहच यंत्रणेच्या हाती

असे करणार पथक काम

* पोलिस आयुक्तालय हद्दीतील दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा अभ्यास करून ब्लॅक स्पॉट निश्चित करणार

* निश्चित केलेल्या ब्लॅक स्पॉट ठिकाणी सतत पाळत ठेवणार

* विशेष पथकाकडून दुचाकी चोरीचे जास्तीत-जास्त गुन्हे उघडकीस आणण्यासाठी उपाययोजना

* रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यादी तयार करून त्यांच्यावर पाळत ठेवणार

* दुचाकी चोरीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाईसाठी प्रस्ताव सादर केले जाणार

* पथकाच्या दैनंदिन कारवाईबाबतची माहिती वरिष्ठांना सादर करणे अनिवार्य, तसेच स्वतःजवळदेखील रेकॉर्ड ठेवण्यात येणार आहे

Bikes stored in the police station.
Nashik : पालकमंत्री पदासाठी गिरीश महाजन यांचे नाव आघाडीवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.