Nashik News: ‘Anti Terrorist Squad’ चा शहरावर ‘वॉच’; पोलिस ठाणेनिहाय स्वतंत्र पथके

Anti Terrorist Squad
Anti Terrorist Squad
Updated on

Nashik News : नाशिक शहरात आर्टिलरी सेंटर, महाराष्ट्र पोलिस अकादमी आणि धार्मिक पर्यटनस्थळ असल्याने नेहमीच दहशतवाद्याच्या हल्ल्याचा धोका राहिला आहेत. तसेच, तीन वर्षांवर सिंहस्थ कुंभमेळा असल्याने, या साऱ्या पार्श्वभूमीवर आयुक्तालय हद्दीतील पोलिस ठाणेनिहाय पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली दहशतवादीविरोधी पथक कार्यान्वित करण्यात आले आहेत.

शहरात होणाऱ्या घडामोडींसह दहशतवादी कृत्य घडण्यास कारणीभूत ठरणाऱ्या प्रत्येक बाबींवर या पथकाच्या माध्यमातून बारकाईने ‘वॉच’ ठेवण्यात येणार आहे. (Anti Terrorist Squads Watch on City nashik news)

पोलिस महासंचालकांच्या आदेशान्वये मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर राज्यात पोलिस आयुक्तालय व अधीक्षक कार्यालयांमध्ये ‘ॲन्टी टेररिस्ट स्कॉड’ (एटीएस) पथक कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे, ज्या शहरांमध्ये सैन्यदलाचे आर्टिलरी सेंटर, पोलिस अकादमी आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील पर्यटनस्थळ आहेत अशा शहरांमध्ये पोलिस ठाणेनिहाय स्वतंत्र दहशतवादीविरोधी पथक नेमले आहेत.

नवनियुक्त पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आयुक्तालयातील एटीएस पथकाची माहिती घेत ती अधिक कार्यक्षमरीत्या सज्जतेचे निर्देश दिले आहेत. अवघ्या तीन वर्षांवर नाशिक शहरातील आंतरराष्ट्रीय पातळीवर सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. तसेच, यापूर्वीही शहरातील संवेदनशिल परिसराची रेकी केल्याप्रकरणी आंतरराष्ट्रीय दहशतवाद्याला नाशिकमधून अटक करण्यात आलेली आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर शहराची सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आत्तापासूनच पोलिस ठाणेनिहाय एटीएसची पथके सक्षम व सज्जतेकडे आयुक्तांनी लक्ष केंद्रित केले आहे.

संस्थांचे फंडिंग

दहशतवादी संघटनांना काही सामाजिक संस्थांकडून आर्थिक मदत केली जाते. या फंडिंगचा वापर गैरकृत्यांसाठी केला जातो. अशा सामाजिक संस्थांच्या आर्थिक व्यवहारांवर पोलिस ठाणेनिहाय असणाऱ्या एटीएस पथकांकडून बारकाईने नजर ठेवली जाणार आहे.

Anti Terrorist Squad
Nashik Police: बेशिस्त वाहनचालकांना पोलिसांचा दणका! सव्वा लाखांचा दंडही केला वसुल

असे आहेत पथके

शहर आयुक्तालय हद्दीमध्ये १३ पोलिस ठाणे असून, प्रत्येक ठाण्यात एक सहाय्यक निरीक्षक वा उपनिरीक्षक आणि दोन अंमलदारांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या पथकावर आयुक्तालयातील विशेष शाखेसह दहशतवादविरोधी पथकांचे नियंत्रण असणार आहे. तसेच, या पथकावर पोलिस आयुक्तांचा थेट वॉच राहणार आहे.

यावर राहणार लक्ष

-गर्दीची ठिकाणे : रेल्वे स्टेशन, बसस्थानक, शहर वाहतूक बसस्थानक, बाजारपेठा, मॉल्स

-वाहन बाजार : जुन्या वाहनांची खरेदी-विक्री करणारी वाहनबाजार, गॅरेजवाले

-भाडेकरू : पुरावे न देता भाड्याने घर घेऊन राहणार

-ट्रॅव्हल्स : खासगी ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून शहरात येणारे

-सोशल मीडिया : सोशल मीडियावरून ठराविक ठिकाणांची सतत सर्फिंग करणारे युजर्स

-बैठका : सामाजिक संस्था-संघटनांतर्फे होणाऱ्या गोपनीय बैठका

"नाशिक शहर सर्वार्थाने महत्त्वाचे व संवेदनशील शहर आहे. तसेच आगामी महत्त्वाचे कार्यक्रम पाहता आत्तापासून नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. त्याच दृष्टिकोनातून पोलिस ठाणेनिहाय एटीएस पथके सक्षम असणे गरजेचे आहे." - संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त, नाशिक.

Anti Terrorist Squad
Nashik Water Management: शहरात पाणीकपातीवरून रंगले राजकारण; पाणी सोडताना गायब झालेल्यांकडून आरोप प्रत्यारोप, दावे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.