Nashik Political: नाशिक तालुका शेतकी संघ निवडणुकीत ‘आपलं पॅनल’ची बाजी! पिंगळे गटाची सरशी; चुंभळे गटाला धक्का

Apala Panel wins in Nashik Taluka Shetki Sangh Election Sarshi of Pingle group shock to Chumbhale group Nashik Political
Apala Panel wins in Nashik Taluka Shetki Sangh Election Sarshi of Pingle group shock to Chumbhale group Nashik Politicalesakal
Updated on

पंचवटी : नाशिक तालुका शेतकी संघाची निवडणूक चुरशीची होऊन देवीदास पिंगळे यांच्या नेतृत्वाखालील आपलं पॅनलने एकहाती सत्ता मिळवून शिवाजी चुंभळे यांना चांगलीच धोबीपछाड दिली आहे.

आपलं पॅनलला १३, तर बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे नेतृत्वाखालील शेतकरी पॅनलला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले आहे. (Apala Panel wins in Nashik Taluka Shetki Sangh Election Sarshi of Pingle group shock to Chumbhale group Nashik Political)

१७ जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीत ३४ उमेदवार रिंगणात असल्याने माजी खासदार तथा नाशिक बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांच्या नेतृत्वाखालील आपलं पॅनल, तर बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलमध्ये सरळसरळ लढत झाली.

मतमोजणी प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक (२) जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, नाशिक राजीव इप्पर, तसेच सहकार विभागातील वरिष्ठ लिपिक अशोक काकड, सहाय्यक अधिकारी तालुका संघाचे संदीप थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली काशीमाळी मंगल कार्यालयात पार पडली.

निवडणुकीत अनेक मातब्बर उमेदवार रिंगणात होते. यात पिंगळे यांचे खंदे समर्थक दिलीप थेटे, तसेच बाजार समितीत पिंगळे यांच्या विरोधी पॅनलमधून निवडून आलेले प्रल्हाद काकड, शिवाजी चुंभळे यांचे बंधू वामनराव चुंभळे, मखमलाबाद सोसायटीचे सभापती संजय पिंगळे, तसेच वाळू काकड, मातोरीचे माजी सरपंच दीपक हगवणे आदी नशीब अजमावत होते.

निवडणुकीतील भटक्या विमुक्त जाती-जमातीच्या लढतीकडे सगळ्यांचे लक्ष लागून होते. विशेष म्हणजे, दोन्ही उमेदवार हे मखमलाबादमधील होते. बाजार समितीचे संचालक प्रल्हाद काकड आणि वाळू काकड यांच्यातील लढतीत वाळू काकड यांनी निवडणुकीत बाजी मारली.

तसेच संजय पिंगळे, बाळकृष्ण हांडोरे यांचादेखील पराभव झाला आहे. तर दिलीप थेटे यांना मात्र यश मिळाले. पिंगळे यांच्या पॅनलला यश मिळाल्याने कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण केली.

या वेळी पिंगळे यांचे समर्थक बाजार समितीचे संचालक संपतराव सकाळे, युवराज कोठुळे, जगन्नाथ कटाळे, माजी संचालक विश्वास नागरे, तुकाराम पेखळे, संजय तुंगार, शंकरराव पिंगळे, सेंट्रल गोदावरीचे संचालक तानाजी पिंगळे, विलास कड, उत्तम खांडबहाले, भीमजी थेटे, राजाराम थेटे, अनिल काकड, आबासाहेब बर्डे, त्र्यंबक कातड, दिलीप बर्वे, भास्कर गोडसे, गोकुळ काकड आदी उपस्थित होते.

Apala Panel wins in Nashik Taluka Shetki Sangh Election Sarshi of Pingle group shock to Chumbhale group Nashik Political
Nashik News: ‘सत्यशोधक’चा बिऱ्हाड मोर्चा स्थगित; महाजन यांची मध्यस्थी

विजयी उमेदवार

सोसायटी गट : आठ जागा

दिलीप थेटे (आपलं पॅनल)

शरद गायखे (आपलं पॅनल)

बबन कांगणे (आपलं पॅनल)

रावसाहेब कोशिरे (आपलं पॅनल)

दिलीप चव्हाण ( आपलं पॅनल )

संजय चव्हाण (शेतकरी विकास पॅनल)

वामनराव चुंभळे (शेतकरी विकास पॅनल)

नवनाथ कोठुळे (शेतकरी विकास पॅनल)

--

वैयक्तिक गट : चार जागा

विष्णू थेटे (आपलं पॅनल)

भिकाजी कांडेकर (आपलं पॅनल)

शांताराम माळोदे (आपलं पॅनल)

दीपक हगवणे (आपलं पॅनल)

महिला राखीव : दोन जागा

आशा गायकर (आपलं पॅनल)

मीरा लभडे (शेतकरी विकास पॅनल)

..

इतर मागास प्रवर्ग - एक जागा

जयराम ढिकले (आपलं पॅनल)

--

भटक्या विमुक्त जाती-जमाती - एक जागा

वाळू काकड (आपलं पॅनल)

--

अनुसूचित जाती-जमाती - एक जागा

ढवळू फसाळे (आपलं पॅनल)

Apala Panel wins in Nashik Taluka Shetki Sangh Election Sarshi of Pingle group shock to Chumbhale group Nashik Political
Onion potato Producers Union Election: बिनविरोधाची परंपरा यंदाही कायम; धनवटे, घुगेंचे वर्चस्व

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.