Nashik News : सोशल मीडियावर अलीकडे तरुणांमध्ये कसल्याही विषयावर रिल्स बनविले जातात आणि ते सोशल मीडियावर व्हायरल केले जातात. परंतु काहींना रिल्समधून भाईगिरी करण्याचा नाद लागला आहे.
मात्र, सोशल मीडियावर शहर पोलिसांचेही वॉच असल्याने रिल्समधून भाईगिरी करणाऱ्यांना पोलिसांनी दणका दिला आहे.
त्यामुळे रिल्समधून भाईगिरी करणाऱ्यांचे आता ‘माफीनाम्या’ चे रिल्सही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Apology after police crackdown problematic to make reels of Criminals Nashik News)
नाशिकमध्ये गेल्या महिन्यात अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जुने सिडकोत खुनाची घटना घडली होती. यातील मुख्य संशयिताने खुनानंतर काही सेकंदामध्ये रिल्स बनवून व्हायरल केला होता.
त्याचप्रमाणे, गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर शहरातील काही तरुण मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह झाले आहेत.
त्यातील काहींना भाईगिरीने पछाडलेले असल्याने ते टपोरी भाषेतील भाईगिरीचा संवाद आणि त्या जोडीला झक्कास संगीत देऊन त्याचे रिल्स बनवून ते सोशल मीडियावर व्हायरल करीत आहेत.
असाच एक रिल्स शहर पोलिसांच्या हाती लागला. त्यामध्ये एकाने तरुणाने भाईगिरीच्या भाषेतील रिल्स तयार केली. त्यामध्ये त्याने कोणाला तरी धमकावण्याच्या उद्देशाने रिल्स केल्याचे दिसून येते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
सदरील रिल्स शहर पोलिसांपर्यंत पोचताच, त्यांनी संबंधित रिल्सवर भाईगिरी करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने ‘माफीनामा’ असलेला आणि यापुढे असा करणार नाही, असे स्पष्ट करणारी रिल्स सोशल मीडियावर व्हायरल केली आहे.
तीच रिल्स नाशिक पोलिसांच्या सोशल मीडियावरही पहावयास मिळते आहे. यातून पोलिसांनी अशाप्रकारे भाईगिरीचे रिल्स करणाऱ्यांना सावधगिरीचा इशाराही दिला आहे.
"कोणीही भाईगिरीचे रिल्स सोशल मीडियावर व्हायरल करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई होऊन गुन्हा दाखल केला जाईल. विशेषत: तरुणांनी सोशल मीडियाचा वापर जपून आणि काळजीपूर्वक करावा. जेणेकरून समाजाच्या नजरेत आपण वाईट व्यक्ती दिसू नये. रिल्स करणाऱ्यावर पोलिसांची करडी नजर आहे." - अंकुश शिंदे, पोलिस आयुक्त, नाशिक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.