Mahavitaran News: वेळेत वीजबिले भरण्याचे महावितरणकडून आवाहन

Mahavitaran
Mahavitaransakal
Updated on

Mahavitaran News : राज्यामध्ये चालू आर्थिक वर्षात दरमहा सरासरी १२ लाख घरगुती वीज ग्राहकांनी वीजबिल तर भरले पण बिल भरण्याची मुदत न पाळल्यामुळे त्यांना दंड भरावा लागला.

वीज ग्राहकांनी वेळेत बिल भरून दंड टाळावा, तसेच वेळेपूर्वी आणि ऑनलाइन बिल भरून सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले.

उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज ग्राहकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व ग्राहकाभिमुख सेवा देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार ग्राहकांना वीज बिलातील सवलतीचा लाभ मिळवून देण्यासाठी महावितरणने पुढाकार घेतला आहे. (Appeal from Mahavitaran to pay electricity bills on time nashik)

लोकेश चंद्र म्हणाले, की चालू आर्थिक वर्षात १ एप्रिल २०२३ नंतर महावितरणचे विविध वर्गवारीतील दरमहा सरासरी एकूण १३ लाख ८९ हजार असे ग्राहक आढळले आहेत की, ज्यांनी नियमितपणे वीजबिले भरली पण बिल भरण्याच्या देय तारखेनंतर बिल भरल्याने त्यांना सव्वा टक्का दंड द्यावा लागला.

यामध्ये १२ लाख ३१ हजार घरगुती ग्राहक आहेत. व्यावसायिक ग्राहकांची संख्या १ लाख ३३ हजार आहे तर औद्योगिक ग्राहकांची संख्या १७ हजार आहे. महावितरणच्या वीजबिलावर मुदतीचा स्पष्ट उल्लेख असतो.

बिल अथवा देयक तारखेपासून २१ दिवसात बिल भरायचे असते. त्याची स्पष्ट मुदत देय तारीख नावाने दिलेली असते. त्यानंतर बिल भरले तर सव्वा टक्का दंड द्यावा लागतो.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Mahavitaran
ZP Home Visit Campaign: जिल्ह्यातील मॉडेल गावांमध्ये गृहभेट अभियान

हा दंड टाळण्यासाठी देय तारखेपर्यंतच बिल भरावे. महावितरणच्या ग्राहकांनी तत्पर बिल भरणा, ऑनलाइन पेमेंट व गो ग्रीनची सुविधा वापरली तर त्यांना वीजबिलात मोठी सवलत मिळते.

वीज ग्राहकांनी मुदतीपूर्वी वीजबिलाचा भरणा केला तर त्यांना प्रॉम्प्ट पेमेंटसाठी अर्थात तत्पर बिल भरणा केल्याबद्दल एक टक्का सवलत मिळते.

हे बिल भीम ॲप, गुगल पे, पेटीएम किंवा बँकेच्या ॲपवरून किंवा महावितरणच्या वेबसाइटवरून किंवा महावितरणच्या मोबाईल ॲपद्वारे असे ऑनलाइन पद्धतीने भरले तर पाव टक्का सवलत मिळते.

याखेरीज ग्राहकांनी छापील कागदी बिलाच्या ऐवजी ई- मेलने बिल स्वीकारण्याचा गो ग्रीनचा पर्यावरण पूरक पर्याय निवडला तर प्रत्येक बिलात दहा रुपये सवलत मिळते.

Mahavitaran
NMC News: काम पूर्ण होण्याअगोदरच काँक्रिट रस्त्याची लागली वाट!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.