अहो काय सांगता, स्पर्श न होता उघडणार दार?...'या' विद्यार्थ्यांनी लढविली अनोखी शक्कल

huk.jpg
huk.jpg
Updated on

नाशिक : सध्या कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्याचे शासकीय यंत्रणेपासून वैयक्‍तिक पातळीवर सर्वांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. अशा या परिस्थितीत विषाणूपासून रक्षण करणारे अनोख्या मास्कचे, तसेच कुठल्याही दाराशी थेट संपर्क येऊ नये, यासाठी अनोखे हुकचे डिझाइन मातोश्री अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी साकारले आहे. थ्रीडी प्रिंटिंग तंत्राचा उपयोग करत या डिझाइनला उत्पादनाचे स्वरूप प्राप्त होणार आहे. 

वेळेचा चांगला उपयोग

लॉकडाउनमुळे महाविद्यालयांना सुट्या जाहीर केलेल्या असताना या वेळेचा चांगला उपयोग मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षकांनी केला आहे. विद्यार्थ्यांना विविध विषयांवरील स्वलिखित नोट्‌स, पॉवर पॉइंट प्रेझेन्टेशन, व्हिडिओ लेक्‍चर इंटरनेटच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आहेत. प्राध्यापक मंडळी विविध ऑनलाइन प्रशिक्षण घेत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपर्क कमी करणे, हे प्रभावी उपाय मानले जात आहे. महाविद्यालयातील नीलेश पाटील व काही विद्यार्थ्यांनी हुकची डिझाइन तयार केली आहे. 

शिल्ड मास्कचेही डिझाइन

याद्वारे घर, कारचे दरवाजे उघडणे विनासंपर्क सोपे होणार आहे. या हुकचा वापर एटीएम मशिन आणि लिफ्टमध्येसुद्धा होऊ शकतो. डॉक्‍टरांसाठी विशेष अशा शिल्ड मास्कचेही डिझाइन नीलेश पाटील याने तयार केले आहे. हे सर्व उत्पादन थ्रीडी प्रिंटिंग मशिनवर तयार करण्यात येतील. या निर्मितीबद्दल संस्थेचे सचिव कुणाल दराडे, प्राचार्य डॉ. गजानन खराटे, थ्रीडी आयडियाचे बिहू महापत्रा, मिलर खंदार, मातोश्री अभियांत्रिकीचे प्रशिक्षण अधिकारी डॉ. नीलेश घुगे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. 

मुंबईतील कंपनीच्या सहकार्याने उत्पादन 

थ्रीडी प्रिंटिंग क्षेत्रातील मुंबईतील कंपनी थ्री आयडिया टेक्‍नॉलॉजीच्या सहयोगाने या उत्पादनांवर कार्य सुरू आहे. हुकबरोबरच स्वस्त किमतीच्या मास्क आणि व्हेंटिलेटर स्प्लिटरच्या डिझाइनही लवकरच तयार होऊन वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मार्गदर्शक मानकांनुसार बनविण्यासाठी मातोश्री महाविद्यालय आणि थ्री आयडिया यांच्यात संयुक्त प्रयत्न सुरू आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.