Nashik : कोरोनाने पालक गमावलेल्या बालकांच्या निधीसाठी अर्ज करा

Corona Updates
Corona Updatesesakal
Updated on

नाशिक : कोरोनात (corona) एक अथवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या शिक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme court) बाल न्याय निधी (Juvenile Justice Fund) उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याअनुषंगाने असे पालक गमावलेल्या बालकांनी शैक्षणिक मदतीसाठी जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय (नाशिक) (District Women and Child Development Office) येथे अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी अजय फडोळ यांनी केले आहे. (application for fund of children lost parents during corona Nashik News)

सर्वोच्च न्यायालयाकडून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधी अंतर्गत बालकांचे शालेय शुल्क, वसतिगृह शुल्क, शैक्षणिक साहित्य खरेदी या कारणांसाठी एकदाच मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी संबंधितांनी आपले तपशिलासह परिपूर्ण अर्ज जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयात नासर्डी पुलाजवळ, समाज कल्याण परिसर, नाशिक- पुणे रोड, नाशिक क्लब समोर, नाशिक या ठिकाणी सादर करावेत. तालुकास्तरीय मिशन वात्सल्य समन्वय समिती, लाभार्थी व पालकांना संपर्क करून या निधीबाबत कळविण्यात आले आहे.

Corona Updates
सेनेची सुरक्षित मते पवारांना उर्वरित राऊतांना : आमदार नीतेश राणे

दरम्यान, या निधीच्या अनुषंगाने आतापर्यंत कार्यालयात ५२२ अर्ज प्राप्त झाले असून त्या अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू आहे. छाननी केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांचे अर्ज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कृती दलाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे.

Corona Updates
Nashik : हत्यारांसह तडीपार संशयितास अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.