Election : जिल्ह्यात 2277 उमेदवारांचे अर्ज वैध; 14 बाजार समिती निवडणुकीत आजपासून माघारीस प्रारंभ

election
electionesakal
Updated on

नाशिक : जिल्ह्यातील १४ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीमध्ये दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची बुधवारी (ता.५) छाननी झाल्यानंतर गुरुवारी (ता.६) सर्व बाजार समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीतील २ हजार २७७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून त्याची याद्या प्रसिद्ध करण्यात आली. छाननीत १५१ अर्ज अवैध ठरले.

याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर शुक्रवारी (ता.७) माघारीस सुरवात होणार असून २० एप्रिल माघारीचा अंतिम दिवस असणार आहे. दरम्यान, याद्या जाहीर झाल्यानंतर पॅनल नेत्यांकडून तालुक्या-तालुक्यांमध्ये प्रचार दौरे सुरू झाले आहेत. (Applications of 2277 candidates valid in district 14 Bazar Samiti elections start from today market committee election nashik news)

जिल्ह्यातील १४ बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रीया सुरू असून सोमवारी (ता.३) अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी इच्छुकांनी मोठी गर्दी केली होती. १४ बाजार समित्यांमधील २ ५२ जागांसाठी विक्रमी २ हजार ४२० अर्ज प्राप्त झाले होते.

यात सोसायटी गटात १४६१, ग्रामपंचायत गटात ६७८, व्यापारी गटात १८३, हमाल मापारी गटातील ९८ अर्जाचा समावेश होता. प्राप्त अर्जाची बुधवारी छाननी प्रक्रीया पार पडली. यात नाशिक बाजार समितीत माजी सभापती शिवाजी चुंभळे व अनिल ढिकले यांनी माजी खासदार देविदास पिंगळे यांच्या अर्जावर हरकत घेतली होती.

त्यामुळे या हरकतींचा निकाल राखीव ठेवण्यात आला होता. गुरुवारी या हरकती फेटाळण्यात आल्याचा निकाल देण्यात आला. घोटी बाजार समितीत देखील शेतकरी असल्याचे पुरावे नसल्याने अनेक अर्जांबाबतचा निर्णय राखीव ठेवण्यात आला होता. यात २१ अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत.

छाननी नंतर गुरुवारी उमेदवारांच्या अंतिम याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. निवडणूक अधिकारी यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात अपील करण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी देण्यात आला असून, या विरोधात जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे अपील करता येईल. गुरुवारी दिवसभर अपील दाखल झालेले नसल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

election
Nashik News : सिन्नर -शिर्डी महामार्गावरील पिंपरवाडी टोल प्लाझावर आजपासून टोलवसुली

मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत २६ अर्ज अवैध झाले तर, १७६ अर्ज वैध ठरले आहेत. पिंपळगाव बाजार समितीच्या निवडणुकीत एकूण १५ अर्ज बाद झाले, तर २६८ अर्ज पात्र ठरले आहेत. दिंडोरी बाजार समितीत १६ अर्ज बाद झाले असून १५६ अर्ज वैध ठरले आहेत. चांदवड बाजार समितीत ११ अर्ज बाद ठरविण्यात आल्याने १८२ अर्ज शिल्लक वैध ठरले आहेत.

नांदगाव बाजार समितीत १७ अर्ज अवैध ठरविण्यात आले असून १३१ अर्ज वैध ठरले आहेत. येवला येथे १४ उमेदवारी अर्ज नामंजूर करण्यात आले असून, २०३ वैध ठरले आहेत.लासलगाव बाजार समितीत ४ जणांचे अर्ज अवैध ठरले असून २०७ अर्ज वैध ठरलेत. सिन्नरला ११ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरलेत.

कळवण बाजार समितीत १८ जागांसाठी दोन अर्ज अवैध ठरविण्यात आले. मनमाडला एक उमेदवारी अर्ज नामंजूर झाला. सुरगाणा येथे २ जणांचे अर्ज अवैध ठरले आहेत. देवळा बाजार समितीत ८ अर्ज अवैध झाले असून १४७ अर्ज वैध ठरले आहे. घोटी बाजार समितीत तब्बल १९ अर्ज अवैध झालेत तर १४० अर्ज वैध ठरलेत.

election
MBA CET Exam : वंचित विद्यार्थ्यांना पुन्हा देता येणार 'या' तारखेला एमबीएची सीईटी परीक्षा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.