नाशिक : शहरातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी आयुक्तालयाने चार नवीन पथके कार्यान्वित केली आहेत. खंडणी, दरोडा व शस्त्रे, अमली पदार्थ आणि गुंडाविरोधी पथकांत पोलिस निरीक्षकांसह सहायक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. गुन्हे शाखेअंतर्गत ही पथके कार्यान्वित असून, गल्लीबोळात प्रभावी पोलिसिंगसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
गुन्हेगारांवर बारीक नजर ठेवण्यासह त्यांना त्वरित गजाआड करण्याचे काम या पथकांकडून होणार आहे. लवकरच या पथकांत अंमलदारांची नियुक्ती होणार आहे. (Appointment of chief for 4 teams of Special Squad of nashik police Commissionerate Nashik News)
पोलिस आयुक्त शिंदे यांच्या आदेशानुसार शहरात दृश्य आणि परिणामकारक पोलिसिंगला सुरवात झाली आहे. रात्री उशिरापर्यंत नाकाबंदी सुरू असून, सायलेन्सरमध्ये बिघाड करून ‘आवाज’ करणाऱ्या दुचाकीचालकांवर गुन्हे दाखल होत आहेत. यामुळे शहरात पोलिसांचा वचक निर्माण होत असून, पथकांनी पोलिस ठाणेनिहाय संशयित, हिस्टरी शीटर, सराईतांची यादी तयार केली आहे.
त्याचे नियंत्रण ‘मध्यवर्ती’ स्वरूपात आयुक्तालयातून होणार आहे. ही पथके अमली पदार्थांची विक्रीस चाप लावणे, खंडणीखोरांना अटकाव करून जरब बसविणे, दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई करणे, शस्त्रांचा अवैध वापर करणाऱ्यांवर वचक निर्माण करणे, गल्लीबोळातील गुंडांची धरपकड करून देणार दणका आणि गुन्हेगारी नियंत्रणासह संशयितांवर जलद कारवाईसाठी कार्यरत आहेत.
या पथकांना आयुक्तालयात कार्यालयाची जागा देण्यात आली असून, मध्यवर्ती स्वरूपात सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील गुंडागर्दी करणाऱ्यांची ‘कुंडली’ मांडण्यात येणार आहे. त्याचे निश्चितच सकारात्मक परिणाम दिसतील, असा पोलिसांचा आशावाद आहे.
अमली पदार्थ विरोधी : पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण, सहायक निरीक्षक हेमंत नागरे
गुंडा प्रतिबंधक : सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते
खंडणी विरोधी : सहायक निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी
दरोडा व शस्त्र विरोधी : सहायक निरीक्षक किरण रौंदळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.