Nashik News: राज्यातील सिमेंट नाला बांधातील गाळ काढण्यासह नाला खोलीकरणास मान्यता

अमरावती अन वर्ध्यातील प्रयोगानंतर सरकारचा निर्णय
Cement nala bandh
Cement nala bandhesakal
Updated on

Nashik News : शिरपूर (जि. धुळे) येथील सिमेंट नाला बांधातील गाळ काढून नाला खोलीकरणाच्या प्रयोगानंतर सरकारतर्फे भेमंडी (जि. अमरावती) आणि सावळी सास्ताबाद (जि. वर्धा) येथे प्रायोगिक तत्त्वावर योजना राबविण्यात आली.

त्यानंतर भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या तांत्रिक समितीच्या शिफारशीनुसार राज्यात अस्तित्वातील सिमेंट नाला बांधातील गाळ काढण्यासह नाला खोलीकरण आणि नवीन सिमेंट नाला बांधास सरकारने मान्यता दिली. (Approval for deepening of drains with removal of silt from cement drain dams in state Nashik News)

उपचारांची कामे आराखड्यात समाविष्ट करून राज्य व जिल्हास्तरावरील योजनांच्या उपलब्ध निधीतून कामे करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनच्या संचालकांनी स्पष्ट केले.

त्याचबरोबर या विभागाचे संचालक रवींद्र भोसले यांनी कामांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. पावसाचे पाणी अडविणे, भूगर्भातील पाण्याचे फेरभरण करणे, गावातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत बळकट करणे, ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे असे उद्दिष्ट त्यासाठी ठेवण्यात आले आहे.

राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी ९२ टक्के क्षेत्र काळा कठीण पाषण, चार टक्के रुपांतरित पाषाण, चार टक्के वालुकामय पाषाण असे एकूण ९६ टक्के क्षेत्र हे कठीण पाषाणाने व्याप्त आहे. उर्वरित चार टक्के भूभाग गाळाचा प्रदेश आहे.

त्यामुळे कठीण पाषाण आणि गाळाच्या भागासाठी मार्गदर्शक तत्त्वे वेगवेगळी ठेवण्यात आली आहेत. आवश्‍यक तेथे भूजल शास्त्रीयदृष्ट्या योग्य ठिकाणी नाला खोलीकरणाच्या उपाययोजना राबविल्यास अधिक लाभ मिळेल, असे स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Cement nala bandh
Crop Insurance: वनहक्क जमीनधारकांना पीकविम्याचा लाभ! राज्यातील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी

कामासंबंधीची तत्त्वे

मूळ नाल्याच्या रुंदीपेक्षा अधिक रुंदी करण्यात येऊ नये. जेणेकरून मूळ नाल्याच्या काठास बाधा पोचणार नाही. तसेच, वाळूसाठा असलेल्या नाल्यांचे खोलीकरण करण्यात येऊ नये. अतिशोषित व शोषित पाणलोट क्षेत्रात ही कामे अग्रक्रमाने करावयाची आहेत.

अस्तित्वातील बंधाऱ्याच्या वरच्या भागात नाला खोलीकरण केल्यास लाभदायक होणार आहे. गाळाच्या भागात खोलीकरणाचे काम केल्याने पाणी जमिनीत मुरून भूजलात वाढ होणार नसल्याने अशी कामे होणार नाहीत.

गाळाच्या भूभागातील ‘बझाडा’ भूस्तराचा भाग हा नाला खोलीकरणासाठी योग्य असेल. सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याच्या टेकड्यांचा उतार संपताच बझाडा प्रकारचा भूस्तर असून, तो छोट्या दगडांपासून बनलेला आहे. त्यामुळे अशा भागात मोठ्या प्रमाणात नाला खोलीकरणाची उपाययोजना राबविण्यात येईल.

गाळाने भरलेले सिमेंट नालाबांध खोलीकरणासाठी प्राधान्याने निवडले जातील. कामासाठी योग्य जागेची निवड उपविभागीय कृषी अधिकारी करतील. बांधातील गाळ काढून मूळ नाला तळापासून तीन मीटर अथवा कठीण भूस्तर लागेपर्यंत यापैकी अगोदरच्या परिस्थितीपर्यंत खोलीकरण केले जाईल.

कोणत्याही परिस्थितीत कठीण भूस्तरात खोदकाम केले जाणार नाही. गाळ काढल्यावर बांधापासून पाच मीटर ‘बर्म' सोडला जाईल.

त्याच्या पुढील बाजूला १ : १ : ५० असा उतार ठेवून त्यास दगडी अस्तरीकरण करावे लागेल. काठास हराळी अथवा स्थानिक गवताचे जैविक अस्तरीकरण होईल. काठावर वृक्षलागवड केली जाईल.

Cement nala bandh
NMC News: मोहिमेतून 5103 भूखंडांची दुहेरी कराच्या जाचातून सुटका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.