नाशिक : सटाणा न्यायालयाच्या नूतन इमारतीला मंजुरी

Approval of new building of Satana Court
Approval of new building of Satana Court esakal
Updated on

सटाणा (जि. नाशिक) : येथील न्यायालय आवारातील नूतन विस्तारीत भव्य इमारतीच्या बांधकामासाठी राज्य शासनातर्फे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून १० कोटी ३७ लाख रूपयांचा भरीव निधी मंजूर झाला आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी म्हणून जिल्ह्यातील ही सर्वात मोठी इमारत ठरणार असून या इमारतीमुळे सटाणा शहराच्या विकासात मोठी भर पडणार आहे. लवकरच या इमारतीचे बांधकाम सुरू होणार असल्याची माहिती सटाणा वकील संघाचे अध्यक्ष व जिल्हा वकील फेडरेशनचे अध्यक्ष अॅड.पंडितराव भदाणे यांनी येथे दिली.

सध्याच्या इमारतीला 139 वर्षे पूर्ण

सन १८८३ मध्ये ब्रिटिश राजवटीत उभारलेल्या सटाणा न्यायालयाच्या इमारतीस यंदा १३९ वर्षे पूर्ण झाले. आजही ही इमारत सुस्थितीत असली तरी कामकाजाच्या दृष्टीने ही इमारत अपुरी पडते. त्यामुळे पक्षकार व वकिलांना अनेक अडचणी उद्भवतात. या पार्श्वभूमीवर वकील संघाचे अध्यक्ष अॅड.पंडितराव भदाणे यांच्या नेतृत्वाखाली अॅड.आर.एम.जाधव, अॅड.मनीषा ठाकुर, अॅड.शोनकुमार देवरे, अॅड.प्रणव भामरे, अॅड.यशवंत पाटील आदींसह वकील संघाच्या सर्व सदस्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची भेट घेऊन त्यांना साकडे घातले होते. त्यानुसार नूतन इमारतीचे काम तत्काळ मार्गी लावण्याचा दिलेला शब्द श्री. भुजबळ यांनी पूर्ण करताना राज्य शासनाकडून बांधकामास १० कोटी ३७ लाख रूपयांचा निधीही मंजूर करून दिला. याकामी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पगार व नाशिक बार असोसिएशनचे सचिव अॅड.जालिंदर ताडगे यांचेही सहकार्य लाभले.

Approval of new building of Satana Court
नाशिक : शिवाजी महाराज हेच व्यवस्थापनाचे विश्‍वगुरू; नितीन बानगुडे-पाटील

या नूतन इमारतीमध्ये दोन मजली वाहनतळ, गॅस पाईपलाईन, बायो डायजेस्टर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलर रुफ टॉप, दिव्यांगांसाठी रॅम्प, फर्निचर, पाणीपुरवठा, विद्युतीकरण, अग्निशमन यंत्रणा, आवार भिंत व प्रवेशद्वार, अंतर्गत रास्ते, मैदानाचा विकास, सिसिटीव्ही यंत्रणा, अंडरग्राऊंड पाण्याची टाकी, पंप हाऊस, वातानुकूलित यंत्रणाही विकसित केली जाणार आहे.

दरम्यान, गेल्या वर्षभरापासून न्यायालयाच्या नूतन विस्तारीत इमारतीच्या बांधकामासाठी सातत्याने पाठपुरावा करून विशेष प्रयत्न केल्याबद्दल सटाणा वकील संघातर्फे आज गुरुवार (ता.१७) रोजी अध्यक्ष अॅड.पंडितराव भदाणे यांचा ज्येष्ठ वकील अॅड.आर.ए.पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. इमारतीचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन पालकमंत्री भूजबळ यांनी दिले असून नूतन इमारतीमध्ये लवकरच दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांचे न्यायालय सुरू होईल, असा विश्वास यावेळी अॅड.भदाणे यांनी व्यक्त केला.

Approval of new building of Satana Court
नाशिक : शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून बनवला रस्ता

कार्यक्रमास अॅड.आर.जे.पाटील, अॅड.ए.एल.पाटील, अॅड.वसंत सोनवणे, अॅड.आर.एम.जाधव, अॅड.सी.एन.पवार, अॅड.यशवंत सोनवणे, अॅड.निलेश डांगरे, अॅड.प्रकाश गोसावी, अॅड.सी.एन.अहिरे, अॅड.विष्णु सोनवणे, अॅड.हिरामण सोनवणे, अॅड.मनीषा ठाकुर, अॅड.बी.डी.खैरणार, अॅड.सुजाता पाठक, अॅड.सरोज चंद्रात्रे, अॅड.रूपाली पंडित, अॅड.एस.आर.सोनवणे, अॅड.सतीश चिंधडे, अॅड.नाना भामरे, अॅड.मोरेश्वर हीरे, अॅड.रोशन पवार, अॅड.अविनाश मोरे आदींसह सर्व सदस्य उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.