Nashik : दिंडोरीच्या अंडरपास, उड्डाणपुलाला मान्यता; डॉ. भारती पवार यांची माहिती

bharati pawar latest marathi news
bharati pawar latest marathi newsesakal
Updated on

नाशिक : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिंडोरी येथे राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपूल आणि अंडरपास कामास तत्वतः मान्यता दिली आहे. त्यासाठी ११५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली. (Approval of underpass flyover at Dindori Dr Bharti Pawar information Nashik Latest Marathi News)

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या नाशिक विभागाची बैठक डॉ. पवार यांच्या कार्यालयात झाली. आमदार डॉ. राहुल आहेर, प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब साळुंखे, व्यवस्थापक दिलीप पाटील, आय.एस.टी.पी.एल.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्ण मोहन आदी उपस्थित होते.

चांदवड येथील टी-जंक्शन, रेणुकादेवी मंदिरात येणाऱ्या भक्तांना पादचारी मार्ग, मनमाडकडे जाणाऱ्या रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडीची समस्या, मुंबई-आग्रा महामार्गावरील वर्दळीचे ठिकाणे त्याचप्रमाणे जऊळके, वणी व चांदवड येथील अपघात प्रवणक्षेत्र याबाबींची गांभीर्याने दखल घेत या ठिकाणांचे सर्वेक्षण करून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

bharati pawar latest marathi news
Nashik : शहरातील Blackspot चौफुल्या अपघात'मुक्त' कधी होणार?

या ठिकाणी उड्डाण पूल व अंडरपास होण्यासाठी डॉ. पवार यांनी श्री. गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली होती. त्यानुसार ही कामे लवकर सुरु करण्यात यावीत आणि कामे दर्जेदार व गुणवत्‍तापूर्ण होतील यावर भर देण्यात यावा, अशा सूचना डॉ. पवार यांनी दिल्या आहेत.

रस्ते व पुलाच्या कामांना मंजुरी

० नाशिक विभागातील २०२२-२३ साठी रस्ते व पुलाच्या कामांना मंजुरी

० दिंडोरी येथील चांदवड जंक्शनसाठी ५९ कोटी ४२ लाख, तर जऊळके वणी येथे उड्डाण पूल व अंडरपाससाठी ५५ कोटी ५२ लाखांची तरतूद

(प्रकल्प संचालक भाऊसाहेब साळुंखे यांनी दिलेली माहिती)

bharati pawar latest marathi news
SAKAL Impact : अभोण्यातील रस्ते दुरुस्तीसाठी सापडला मुहूर्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.