'एप्रिल फुल बनाया...' म्हणत नाशिककरांनी अनुभवले रंजक किस्से

April Fools' Day
April Fools' Day esakal
Updated on

नाशिक : 'एप्रिल फुल बनाया, तुमको गुस्सा आया' या हिंदीतील गाजलेल्‍या गीताची आठवण आज अनेकांना दिवसभरात झाली. शुक्रवारी (ता.१) आप्तस्‍वकीय, मित्रांना एप्रिल फुल बनवण्याच्‍या प्रयत्‍नातून अनेक विनोदी किस्से घडले. सोशल मिडीयावर एप्रिल फुलचा (April Fool Day) फिव्‍हर बघायला मिळाला. यात राज्‍यात राष्ट्रपती राजवट (Presidential reign) लागू झाल्‍याच्‍या अफवेसह व्‍हॉट्‌सॲप ग्रुपमधून रिमुव्‍ह केल्‍याच्‍या संदेशाने अनेकांची धांदळ उडविली.

एप्रिल फुलची धम्‍माल...

दरवर्षीप्रमाणे यंदाही एप्रिल फुलनिमित्त रंजक किस्से नाशिककरांना अनुभवायला मिळाले. एका वृत्तवाहिनीवरील जुनी चित्रफीत सोशल मिडीयावर (Social Media) व्‍हायरल झाली. यात महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्‍याचे सांगण्यात येत होते. अनेकांना यासंदर्भात खात्री न पटल्‍याने त्‍यांनी आपल्‍या स्‍टेटसला व्‍हिडीओ ठेवत व अन्‍य ग्रुपमध्ये शेअर करत एप्रिल फुल ठरले. या व्‍हिडीओच्‍या शेवटच्‍या भागात एप्रिल फुलचे गाणेही जोडण्यात आलेले होते. तर काहींनी व्‍हॉट्‌सॲप (Whatsapp) ग्रुपमधून काढून टाकल्‍याचे भासवत सदस्‍यांना एप्रिल फुल केले. सोशल मिडीयाप्रमाणे वैयक्‍तिक आयुष्यातही एप्रिल फुलची धम्‍माल अनुभवायला मिळाली. सायंकाळी उशीरापर्यंत गमती जमती घडत होत्‍या. युवा वर्गात या दिवसानिमित्त उत्‍साह बघायला मिळत होता.

April Fools' Day
Realme GT 2 Pro भारतात लॉन्च; जाणून घ्या फोनची किंमत, फीचर्स

अनेकांकडून आठवणींना उजाळा

यापूर्वीच्‍या काळात एप्रिल फुल झाल्‍याच्‍या अनेक विनोदी किस्यांना नेटकऱ्यांनी उजाळा दिला. आपली फसवणूक कशा प्रकारे झाली, हे सांगतानाचे रंजक किस्से सोशल मिडीयावर व्‍हायरल होत होते. यामुळे संबंधितांच्‍या मित्र परिवाराचे दिवसभर चांगलेच मनोरंजन झाले.

April Fools' Day
चीनमध्ये विचित्र मार्गदर्शक तत्त्वे जारी; म्हणते एकत्र झोपू नका अन्...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()