Nashik : रेल्वे बुकिंग अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार

Angry karting agents, traders near the booking office at the train station.
Angry karting agents, traders near the booking office at the train station.esakal
Updated on

मनमाड (जि. नाशिक) : रेल्वेचे बुकिंग (Railway Booking) अधिकारी मनमानी कारभार करत असून, त्यांच्या गलथान कारभारामुळे मालाची बुकिंग न करता सदर माल बेवारस दाखवून लिलाव करण्याचा प्रकार सुरू असल्याने संतप्त झालेल्या कारटिंग एजंटांनी या प्रकारचा निषेध करून सदर अधिकाऱ्यांवर कारवाई करून लिलाव करण्यात येणारा माल परत मिळण्यासाठी साखळी उपोषणाचा इशारा देत निवेदन दिले आहे (Arbitrary handling of railway booking officers Nashik)

मनमाड रेल्वे जंक्शन स्थानक हे उत्तर भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. या ठिकाणाहून प्रवासी गाड्यांसह मालवाहतूक देखील मोठ्या प्रमाणात केली जाते. मनमाड स्थानकावरून शेतमालासह इतर माल परराज्यात पाठविला जातो. हा माल कारटिंग एजंटद्वारे पाठवला जातो, याबाबत अधिकाऱ्यांनी गलथान कारभार केल्यामुळे एजंटांनी आरोप करत निवेदन दिले असून, त्यात म्हटले आहे, की ३ तारखेला व्यापाऱ्याने कारटिंग एजंट अनिस पठाण यांनी ५२ बंडल केसांचा माल बुक करण्यासाठी रेल्वेस्थानकात आणला होता. यातील ४५ बंडल हा फलाट क्रमांक ६ वर नेवून ठेवून ६ बंडल माल बुकिंग ऑफिसमध्ये आणला होता.

एकूण ५२ बंडल माल बुक करायचा होता. मात्र चीफ पार्सल सुपरवायझर विवेक भालेराव आणि मुख्य वाणिज्य निरीक्षक बी. एल. मिणा यांनी सदर माल बुक करण्यासाठी पैशांची मागणी केली. मात्र कारटिंग एजंट यांनी पैसे देण्यास मनाई केली असता, मनात राग धरून केवळ ६ बंडल माल बुकिंग केला, तर फलाटवर ठेवलेला माल बेवारस दाखवून अकोला येथे पाठविण्यात आला आहे. याबाबत सदर कारटिंग एजंट विचारण्यास गेले असता, त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिलीच मात्र सदर माल लिलाव करण्यात येणार असल्याचेही कळविले आहे. सदर माल हा ९० लाख रुपयांचा असल्यामुळे अधिकाऱ्यांच्या मनमानी आणि गलथान कारभारामुळे नुकसान होणार आहे. सदर व्यापारी आणि एजंट हे रेल्वे नियमानुसार दंड भरण्यास तयार असून, लिलाव करू नये, असे सांगत आहेत.

Angry karting agents, traders near the booking office at the train station.
Nashik : आठवडे बाजारात मेथीची जुडी खातेय भाव

मात्र अधिकारी ऐकत नसल्याने अखेर मनमाड रेल्वेस्थानक बुकिंगमध्ये कार्यरत असलेल्या सर्व कारटिंग एजंट, व्यापारी, कामगार यांनी संताप व्यक्त केला असून, याबाबत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. ४८ तासांत माल व्यापाऱ्यास परत करावा, दंडाची रक्कम देण्यास तयार आहे. मालाचा लिलाव करू नये अन्यथा साखळी आणि त्यानंतर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा कारटिंग एजंट अनिस पठाण, शिवाजी जाधव, हरीश शर्मा, श्रीराम यादव, मारुती शिंदे, दिलीप नरवडे, युसूफ खान, सुनील त्रिभुवन, उत्तम हुसळे, आशिष चावरीय, द्राक्ष कामगार संघटना पदाधिकारी यांनी दिला आहे.

Angry karting agents, traders near the booking office at the train station.
जि. प. गट अन पं. स. गणांच्या 18 जुलैला प्रारुप मतदार याद्या

"माझा माल बुक न करता रेल्वेचे अधिकारी विवेक भालेराव, बी. एल. मिणा यांनी माझ्यावर अन्याय करून मालाचा बेवारस म्हणून लिलाव करत आहेत. सदर प्रकारामुळे व्यापाऱ्याचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे जी दंडाची रक्कम आहे ती घ्यावी आणि माल परत मिळावा."
- अनिस पठाण, कारटिंग एजंट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.