Nashik Agriculture News : जिल्ह्यात 3 हजार एकर क्षेत्र बनले सुपीक; बंधाऱ्यांच्या साठवण क्षमतेतही मोठी वाढ

Silt free dam Silt filled Shiwar News
Silt free dam Silt filled Shiwar Newsesakal
Updated on

Nashik Agriculture News : राज्य सरकारने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू केल्यावर जिल्ह्यातील धरणांमधून उपसलेल्या गाळामुळे तीन हजार एकर क्षेत्र सुपीक बनले आहे. याशिवाय, धरण व बंधाऱ्यांची साठवण क्षमता १४ दशलक्ष घनफूट इतकी वाढली.

( area of ​​3 thousand acres has become fertile in district nashik news)

राज्य सरकारने २०१७ मध्ये गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना सुरू केली. या योजनेची मुदत २०२१ मध्ये संपल्यावर ती तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने बंद केली होती.

आता विद्यमान सरकारने पुन्हा ही योजना सुरू केली आहे. या उन्हाळ्यात जिल्हा जलसंधारण विभागाने नाशिक जिल्ह्यात जवळपास चार लाख घनमीटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यानुसार जलसंपदा व जलसंधारण या विभागांनी १०० टक्के उद्दिष्ट गाठले आहे.

जूनपर्यंत हे उद्दिष्ट गाठणे शक्य झाले नव्हते. मात्र, पाऊस लांबल्याने जूनअखेरपर्यंत उद्दिष्ट गाठल्याची माहिती जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता हरिभाऊ गिते यांनी दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Silt free dam Silt filled Shiwar News
Jalgaon Agriculture News : चाळीसगावात मुगाला विक्रमी भाव; बाजार समितीमध्ये उच्चांकी दर

नाशिक जलसंपदा विभाग, पालखेड जलसंपदा विभाग व गिरणा जलसंपदा विभाग तसेच जलसंधारणच्या दोन्ही विभागांनी मिळून चार लाख एक हजार घनमीटर गाळ धरणांमधून काढून तो शेतात पसरविण्यासाठी उपलब्ध करून दिला आहे.

योजनेची व्याप्ती वाढणार

यंदा जिल्ह्यातील मोठी धरणे ५० टक्क्यांच्या आसपास भरली असली, तरी ० ते ५०० हेक्टर सिंचनक्षमता असलेल्या धरणांमध्ये अद्याप साठा झालेला नाही. यामुळे पावसाळ्यात या तलावांमध्ये साठा न झाल्यास आगामी काळात तेथेही मोठ्या प्रमाणात गाळमुक्त धरण योजना राबवली जाऊ शकते.

Silt free dam Silt filled Shiwar News
Dhule Agriculture News : क्रांतिकारकांच्या गावाचा मुळा खातोय भाव; सुरत, शहादा बाजारात लिलावास प्रथम प्राधान्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.