Nashik Bribe Crime: पाण्याचे नमुने तपासणीसाठी लाच घेताना अटक; ACBची कारवाई

bribe
bribeesakal
Updated on

Nashik Bribe Crime : जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत पाण्याचे नमुने तपासणीचा अहवाल सकारात्मक देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना एकाला रंगेहाथ अटक करण्यात आली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (ता. २९) कारवाई केली. (Arrested for accepting bribes for testing water samples Action by ACB Nashik Bribe Crime)

वैभव दिगंबर सादिगले (४८, रा. वक्रतुंड अपार्टमेंट, तिडके कॉलनी, नाशिक. मूळ रा. टिळेकर नगर, कोंडा, पुणे) असे लाचखोर वरिष्ठ अणुजीव सहाय्यकाचे नाव आहे.

तक्रारदार हे त्यांच्या भावाच्या नावाने नोंदणी केलेली संस्था तसेच इतर तीन संस्थांचा केटरिंग व्यवसाय करतात. त्या चारही संस्थांच्या केटरिंग व्यवसायाकरीता जे पाणी वापरले जाते, त्या पाण्याचे एकूण चार नमुने तपासणीसाठी त्यांनी जिल्हा प्रयोग शाळेत दिले होते.

सदरील पाण्याचे अहवाल सकारात्मक देण्यासाठी लाचखोर सादिगले याने शासकीय शुल्काव्यतिरिक्त प्रत्येक पाणी नमुन्याचे ५०० रुपये याप्रमाणे चार नमुन्यांचे एकूण दोन हजार लाचेची गेल्या शुक्रवारी (ता. २६) मागणी केली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

bribe
Delhi Crime: शालेय विद्यार्थ्यांवर वर्गातील मुलांकडूनच सामुहिक अत्याचार; शिक्षकांकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर मंगळवारी (ता. २९) सापळा रचला.

तक्रारदाराकडून दोन हजार रुपयांची रक्कम पंचासमथ घेतल्यानंतर दबा धरून असलेल्या पथकाने लाचखोर सादिगले यास अटक केली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

सदरची कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मीरा आदमाने, प्रविण महाजन, नितीन कराड, प्रमोद चव्हाणके यांनी बजावली.

bribe
Solapur Crime : वास्तुशांतीला गेल्यावर घरफोडी; घरात प्रवेश करून बेडरूममधील...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.