Onion Price News : मनमाड कृउबात लाल कांद्याची आवक; सरासरी एक हजाराचा भाव

Onion auction started in Manmad Agricultural Produce Market Committee
Onion auction started in Manmad Agricultural Produce Market Committeeesakal
Updated on

मनमाड (जि. नाशिक) : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नव्या उन्हाळ कांदा लिलावाला सुरवात करण्यात आली. हंगामातील उन्हाळ कांदा लिलावासाठी आला होता. यावेळी पूजन करून बोली लावण्यात आली. उन्हाळ कांदा व मका मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी बाजार समितीमध्ये आवक झाली होती. (Arrival of red onion in Manmad market committee average price of one thousand nashik news)

४१७ वाहनातून आलेल्या कांद्याचा लिलाव करण्यात आला.यात उन्हाळ कांद्याचे ५३ नग वाहनात जास्तीत जास्त १ हजार ५०१ रुपये तर सरासरी १००० रुपये इतका भाव मिळाला. लाल कांद्याचे ३५६ नग वाहनात जास्तीत जास्त ८२६ रुपये तर सरासरी ६०० रुपये इतका भाव मिळाला.

सफेद कांद्यास ९२१ रुपये तर सरासरी ८०० रुपये इतका भाव मिळाला. तर मक्याला २ हजार ११६ रुपये तर सरासरी २ हजार १५५ रुपये इतका भाव मिळाला. उन्हाळी मक्याला २ हजार २५१ रुपये तर सरासरी २ हजार १३० रुपये इतका भाव मिळाला.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

Onion auction started in Manmad Agricultural Produce Market Committee
Police Recruitment : नाशिक ग्रामीणच्या पोलिस शिपाई उमेदवारांची 'या' तारखेला लेखी परीक्षा

बाजार समितीच्या आवारात मोठ्याप्रमाणात सर्वच शेतमाल विक्रीसाठी आले होते. दरवर्षी उन्हाळ कांदा जास्त प्रमाणात विक्रीसाठी येत असल्याने लिलावासाठीचा चालू हंगामात शुभारंभ करण्यात आला.

यावेळी पहिल्या मालाची बोली लावण्या अगोदर बाजार समितीचे सचिव विश्वास राठोड आणि शेतकऱ्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी मान्यवरांचा बाजार समितीच्यावतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बाजार समितीचे वसंत उगले, रमेश आहेर, गणेश आहेर, मनोज गंभीरे, भगवान चौधरी आदींसह उपस्थित होते.

Onion auction started in Manmad Agricultural Produce Market Committee
Rajya Natya Spardha : अहिंसेच्या अज्ञानावर प्रकाशझोत टाकणारे ‘रक्ताभिषेक’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.